- आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : तीन दिवसांच्या प्रदीर्घ संघर्षानंतर हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेसचे संकट टळले असून, सध्या तरी हिमाचल प्रदेशचे सरकार आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची दोन्ही सुरक्षित आहेत. काँग्रेस नेतृत्वाने मुख्यमंत्री सुख्खू यांना जीवदान दिले आहे.
हरयाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर प्रतिभा सिंह आणि नंतर उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांच्याशी चर्चा केली. या यानंतर कॅबिनेट मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी राजीनामा मागे घेण्याची घेतला.
काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्दचंडीगड : हिमाचल प्रदेशातील सर्व सहा बंडखोर काँग्रेस आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष कुलदीपसिंह पठानिया यांनी गुरुवारी जाहीर केला. संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन चौहान यांनी दलबदल कायद्याअंतर्गत याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर राजिंदरसिंह राणा, चैतन्य शर्मा, सुधीर शर्मा, रवी ठाकूर, देवेंद्र भुट्टो आणि इंदर दत्त लखनपाल यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
तीन महिन्यांनंतर मुख्यमंत्री बदलणारखरेतर, तीन महिन्यांनी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू यांना बदलण्याचे आश्वासन काँग्रेस नेतृत्वाने दिले आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत सुक्खू यांना मुख्यमंत्रिपदी राहू देण्यात येणार आहे. सरकार सुरक्षित राहावे, यासाठी क्रॉस व्होटिंग करणाऱ्या सहा आमदारांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
समन्वय समिती स्थापन करणारनाराज आमदारांच्या मागणीनुसार सरकार व संघटनेतील समन्वयासाठी समिती स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांकडील खात्यांमध्येही कपात करण्यात येणार आहे. सुख्खू यांना तातडीने हटवण्याचा निर्णय काँग्रेस नेतृत्वाने योग्य मानला नाही. यामुळे एक ट्रेंड सुरू होत त्याचा परिणाम बाकी राज्यांवर झाला असता.