देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. सर्वच पक्ष उमेदवारांची घोषणा करत आहेत. अनेक उमेदवारांना तिकिटे मिळाली आहेत. तसेच तिकीट मिळूनही उमेदवारी नाकारणारे काही उमेदवार आहेत. हिमाचल प्रदेशकाँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत.
हिमाचल काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांना मंडीतून उमेदवारी देण्यात आली. त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. हिमाचल काँग्रेस अध्यक्ष म्हणाल्या की, "सरकार सत्तेत असताना कार्यकर्त्यांसाठी काहीही केलं नाही. अशा स्थितीत कार्यकर्ते आम्हाला मत कसं देणार?"
"जो पर्यंत बाकी तिकिटांचा प्रश्न आहे, आमच्याकडे अजून वेळ आहे. हिमाचल प्रदेशमध्ये 1 जूनला मतदान आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनीही आमच्याकडे अजून वेळ असल्याचे बैठकीत सांगितलं. काही दिवसांतच लोकसभा आणि विधानसभेच्या तिकीटांचा निर्णय होईल."
हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आता बॅकफूटवर आहे. आपल्या सरकारवर हल्लाबोल करत प्रतिभा सिंह म्हणाल्या आहेत की, सरकारने आजपर्यंत कार्यकर्त्यांसाठी काहीही केलेलं नाही. अशा स्थितीत कार्यकर्ते आम्हाला मत कसं देणार? त्यामुळे मी निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. काँग्रेस अध्यक्ष असल्याने मला हिमाचलच्या सर्व भागांचा दौरा करावा लागेल.