Himachal Pradesh Election: गुजरातमध्ये काँग्रेसचा दारुण पराभव झाला असला तरी, हिमाचल प्रदेशातकाँग्रेसने सत्ता काबीज केली आहे. यानंतर आता मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आणि हिमाचलच्या विजयाच्या शिल्पकार प्रतिभा सिंह मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक आहेत, पण पक्ष नेतृत्वाला त्या मुख्यमंत्री नको आहेत. वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबातून सीएम न झाल्यास पक्षात फूट पडेल, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे.
...तर पक्षात फूट पडेलमीडिया रिपोर्ट्सनुसार, वीरभद्र कुटुंबाला 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा प्रतिभा सिंह यांच्या कॅम्पने केला आहे. हिमाचलमध्ये पंजाबप्रमाणे दुसऱ्याला मुख्यमंत्री बनवण्याची चूक करू नये, असे समर्थकांना वाटते. शिवाय, वीरभद्र यांच्या नावावर निवडणूक लढवली, त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा अधिकार वीरभद्र कुटुंबाचाच आहे, असेही त्यांची मत आहे. सध्या केंद्रीय पर्यवेक्षक आणि प्रभारी राजीव शुक्ला यांची भेट घेऊन प्रतिभा सिंह आपली बाजू मांडत आहेत.
पक्ष नेतृत्वाचा नकारहिमाचल प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा प्रतिभा सिंह यांना खासदारपदावरून हटवून मुख्यमंत्री बनवण्यास हायकमांड अनुकूल नसल्याची माहितीही मिळत आहे. मंडी जिल्ह्यातील विधानसभेच्या 10 पैकी 9 जागांवर काँग्रेसचा पराभव झाला आहे. अशा स्थितीत मंडी लोकसभा जागेची लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस हायकमांडला नकोय. दरम्यान, ओबेरॉय हॉटेलबाहेर वीरभद्र समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येतीये.
हे नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयामुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे म्हटले जात आहे. तसेच, पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याच्या विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते मुकेश अग्निहोत्री यांचाही या शर्यतीत समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.