शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

Himachal Pradesh Election: ईव्हीएम खासगी वाहनात! हिमाचलमध्ये सहा निवडणूक कर्मचारी निलंबित; विरोधक संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 8:24 AM

Himachal Pradesh Election 2022: खासगी वाहनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आढळल्याने निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबितांत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

- बलवंत तक्षकचंडीगड : खासगी वाहनात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आढळल्याने निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशमधील सहा निवडणूक कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. निलंबितांत दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

रामपूर विधानसभा मतदारसंघातील दत्तनगर गावचे हे प्रकरण आहे. तेथील निवडणूक पथकात समावेश असलेल्या जगतराम, इंदरपाल, राजेश कुमार, प्रदीपकुमार, विपिन आणि गोवर्धनसिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. या कर्मचाऱ्यांच्या खासगी वाहनात ईव्हीएम सापडल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी तासभर गोंधळ घातला. निवडणूक निरीक्षक भावना गर्ग यांनी पुढाकार घेत वाद मिटवला. यानंतर निवडणूक आयोगाने चौकशीअंती सहा कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले.

खासगी वाहनात ईव्हीएम सापडल्याचे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ही बाब सहायक निवडणूक अधिकारी सुरेंद्र मोहन यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. तेव्हा त्यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना जीपीएस बसविलेल्या शासकीय वाहनात ईव्हीएम ठेवण्याचे आदेश दिले. आयोगाकडून या ईव्हीएमची तपासणी केली जाणार आहे.

अधिकारी काय म्हणतात? nया प्रकरणाची माहिती मिळताच काँग्रेसचे आमदार नंदलाल व कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचून गोंधळ सुरू केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक निवडणूक अधिकारी आणि पोलिस उपअधीक्षकही घटनास्थळी पोहोचले. nनिवडणूक निरीक्षक भावना गर्ग यांनी खासगी वाहनातून ईव्हीएम आणणे नियमांच्या विरोधात असल्याचे मान्य केले.

बेरीज-वजाबाकी सुरू...चंडीगड : हिमाचल प्रदेशातील मतदानानंतर सर्व उमेदवार आपापल्या विजयाच्या बेरीज-वजाबाकीत गुंतले आहेत. मतदान झाल्यानंतर काँग्रेस व भाजप नेते हिमाचलात सरकार बनविण्याचा दावा करीत आहेत. जातीय व प्रादेशिक समीकरणांच्या हिशेबाने विजय निश्चित असल्याचे गणित सांगितले जात आहे. ८ डिसेंबर रोजी निवडणुकीचे निकाल येईपर्यंत ही चर्चा सुरूच राहणार आहे.येथे ७५ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. मागील निवडणुकीच्या तुलनेत एक टक्का मतदान जास्त झाले. ज्या जागांवर चारपेक्षा अधिक उमेदवार मैदानात आहेत, तेथे हार-जीतचा फैसला फार कमी मतांनी होणार आहे.भाजपचे डबल इंजिन खराब झाले असून, तेल-पाणी बदलण्याऐवजी इंजिनच बदलावे लागेल, असे काँग्रेस नेते सांगत आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांचे म्हणणे आहे की, जनतेने यावेळी बदल करण्यासाठी मतदान केलेले आहे. नड्डा म्हणतात - लोकांनी मोदींना आशीर्वाद दिलाभाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे की, हिमाचलात लोकांनी पुन्हा एकदा भाजपला आशीर्वाद दिला आहे. जेव्हा जेव्हा निवडणुका होतात, तेव्हा तेव्हा लोक त्यांनाच आशीर्वाद देतात. मोदींमुळे हिमाचल मुख्य प्रवाहात आले. राज्यात विकास झाला व ज्यांचा कधी विचारही केला नव्हता असे मोठमोठे प्रकल्प येथे आलेले आहेत. त्याचमुळे लोक भाजपला पुन्हा एकदा आशीर्वाद देतील.दावे-प्रतिदावेहिमाचलात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याची परंपरा आहे. या वेळी भाजप परंपरा तोडण्याचा तर काँग्रेस सरकार बदलण्याचा दावा करीत आहे. विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री म्हणतात की, भाजप सत्तेतून बाहेर गेली आहे. आता फक्त घोषणा व्हायची आहे. या दाव्या-प्रतिदाव्याने नड्डा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनHimachal Pradeshहिमाचल प्रदेशElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग