Himachal Pradesh Election Result: अवघ्या सहा महिन्यात सत्ता खेचून आणली; हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह यांचे नाव चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 05:30 PM2022-12-08T17:30:37+5:302022-12-08T17:30:59+5:30

Himachal Pradesh Election Result: सहावेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या वीरभद्र सिंह यांच्या पत्नीचे नाव सध्या चर्चेत आहे.

Himachal Pradesh Election Result: Pratibaha Singh pulled power in just six months; Pratibha Singh's name in discussion for the post of Chief Minister of Himachal Pradesh | Himachal Pradesh Election Result: अवघ्या सहा महिन्यात सत्ता खेचून आणली; हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह यांचे नाव चर्चेत

Himachal Pradesh Election Result: अवघ्या सहा महिन्यात सत्ता खेचून आणली; हिमाचलच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रतिभा सिंह यांचे नाव चर्चेत

Next

Himachal Pradesh Election Result: भारताच्या उत्तरेकडील डोंगराळ भागात वसलेल्या हिमाचल प्रदेशातकाँग्रेसने भाजपची सत्ता उलथून लावली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निकालासोबतच आता मुख्यमंत्रिपदावर कोण बसणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, दिवंगत काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांच्या कुटुंबीयांनी पुन्हा एकदा राज्याची सूत्रे हाती घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान झाले होते. आज सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत काँग्रेस सरकार स्थापन करणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यासोबतच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचीही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री कोण होणार हे निवडून आलेले आमदार ठरवतील, असे प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख प्रतिभा सिंह यांनी म्हटले आहे. पण, प्रतिभा सिंह मुख्यमंत्री होतील, अशी दाट शक्यता आहे. 

कोण आहेत प्रतिभा सिंह?
प्रतिभा सिंह या वीरभद्र सिंह यांच्या पत्नी आहेत. वीरभद्र हे सहा वेळा राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत. 1998 मध्ये त्या सक्रिय राजकारणात आल्या. मंडी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली. यामध्ये भाजपचे महेश्वर सिंह आणि त्यांचे मेहुणे यांनी त्यांचा सुमारे 1.25 लाख मतांनी पराभव केला. महेश्वर सिंग हे त्यांचे मेहुणे.

जयराम ठाकूर यांचा मोठ्या फरकाने पराभव 
त्यानंतर 2004 च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिभा यांनी दुसऱ्यांदा नशीब आजमावले. यात त्यांनी महेश्वर यांच्याकडून जुन्या पराभवाचा बदला घेत संसदेत पोहोचल्या. 2012 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर वीरभद्र सिंह यांनी लोकसभेचा राजीनामा दिला. यानंतर 2013 मध्ये पोटनिवडणूक झाली. यामध्ये प्रतिभा यांनी विद्यमान मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांचा प्रचंड मतांनी पराभव केला.

हायकमांडने प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली
2014 साली मोदी लाटेत प्रतिभा यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यांचा भाजपच्या रामस्वरूप शर्मा यांनी 39 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. 26 एप्रिल 2022 रोजी काँग्रेस हायकमांडने त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती. सहा महिन्यांच्या या जबाबदारीत प्रतिभा यांनी आपली राजकीय प्रतिभा सिद्ध केली. 

Web Title: Himachal Pradesh Election Result: Pratibaha Singh pulled power in just six months; Pratibha Singh's name in discussion for the post of Chief Minister of Himachal Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.