शिमला: शिवसेना आणि अभिनेत्री कंगना राणौत यांच्या सध्या वाकयुद्ध रंगलं आहे. कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानं आक्रमक झालेल्या शिवसेनेनं कंगनाला थेट इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेश सरकारनं कंगनाला संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दलची माहिती हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी दिली आहे. याबद्दलच्या सूचना राज्याच्या डीजीपींना दिल्याचंही ठाकूर यांनी सांगितलं.तुम्ही वापरलेला 'तो' शब्द निषेधार्ह; केदार शिंदेंनी राऊतांना करून दिली शिवरायांची आठवणकंगनानं काही दिवसांपूर्वीच हिमाचल प्रदेश सरकारकडे सुरक्षेची मागणी केली होती. कंगनाला सुरक्षा पुरवण्यासाठी तिच्या वडिलांनी डीजीपींनी पत्र लिहिल्याची माहिती ठाकूर यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली. 'कंगनाच्या बहिणीनं काल मला फोन केला होता. तिला ९ सप्टेंबरला मुंबईला जायचं आहे. कंगनाला मुंबई दौऱ्यात सुरक्षा देण्याचा विचार सुरू आहे. कंगनाला हिमाचल प्रदेशची कन्या आहे. त्यामुळे तिच्या संरक्षणाची जबाबदारी आमची आहे,' असं ठाकूर म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?कंगनानं महाराष्ट्राची माफी मागितली तर तिला माफ करण्याचा विचार करु, तिने मुंबईचा उल्लेख मिनी पाकिस्तान केला आहे. तिच्यात हिंमत असेल तर जे मुंबईबद्दल बोलली तेच अहमदाबादविषयी बोलेल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. संजय राऊत यांनी कंगनाबद्दल एक आक्षेपार्ह शब्द वापरला.महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी राज्यासाठी काय केलं? कंगनाचा तिखट सवाल
काय आहे प्रकरण?अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.संजय जी, 9 सप्टेंबरला भेटूच; जय हिंद, जय महाराष्ट्र!; Video पोस्ट करून कंगनानं दिलं आव्हान
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशाराकंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला होता."माझी ताकद काय आहे, ते १०५ आमदार असूनही विरोधी पक्षात बसलेल्यांना विचारा!"