"...तर कळणार नाही कंगना आहे की, कंगनाची आई"; काँग्रेस नेत्याचा तोल सुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 06:58 PM2024-09-04T18:58:17+5:302024-09-04T18:58:28+5:30
Kangana Ranaut: हिमाचल प्रदेशातील एका मंत्र्याने मंडीची खासदार कंगना रणौतबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.
Himachal MLA Negi Remark on Kangana Ranaut: अभिनेत्रीवरुन खासदार झालेल्या कंगना रणौतबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप खासदार कंगना रणौतबद्दल काही दिवसांपूर्वी माजी खासदाराने वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर आता हिमाचल प्रदेशातीलकाँग्रेसच्या एका मंत्र्याने केलेल्या विधानाने नवा वाद उफाळून आला आहे. कंगनाच्या मेकअपवरुन काँग्रेस नेत्याने केलेल्या टीकेने भाजप आक्रमक झाली आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्याने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
हिमाचल प्रदेशचे मंत्री जगत सिंह नेगी यांनी मंडी लोकसभा खासदार कंगना रणौतबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर कंगना पावसात हिमाचलमध्ये आली असती तर तिचा मेकअप बिघडला असता आणि मग ती कंगना आहे की तिची आई आहे हे कळले नसते, असं धक्कादायक विधान मंत्री जगत सिंह नेगी यांनी केली आहे. जगतसिंह नेगी यांनी विधानसभेतील भाषणादरम्यान हे वक्तव्य केलं. या विधानावरुन आता भाजपकडून रोष व्यक्त करण्यात येत आहे.
"आताच कुठेतरी ढगफुटी झाली आणि पोहोचायला दोन दिवस लागले. जसे कंगनाने केले होते. कंगनाने सांगितले होते की तिला काही अधिकारी-आमदार म्हणाले की, हिमाचलमध्ये रेड आणि यलो अलर्ट आहे, त्यामुळे आता येऊ नका. कंगनाच्या मतदारसंघात २४ जणांना जीव गमवावा लागला होता. मंडीमध्ये ९ जणांना जीव गमवावा लागला होता. बहुधा जयराम जी त्या आमदारांमध्ये असतील ज्यांनी कंगनाला आता येऊ नका असे म्हटले असेल. सगळं सुरळीत झाल्यावर त्या तिथे पोहोचल्या. पावसात तिचा सगळा मेकअप बिघडेल म्हणून ती आली नाही. त्यामुळे कंगना होती की कंगनाची आई हे कळू शकले नसते. सर्व काही व्यवस्थित झाल्यानंतर कंगना मगरीचे अश्रू ढाळत निघून गेली. असो, तसंही काय करायचं होतं, ती मोठ्या मोठ्या गोष्टी बोलते," असं जगत सिंह नेही भर विधानसभेत म्हणाले.
वादग्रस्त विधानाची चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेस नेते जगतसिंग नेगी यांनी कंगना रणौतवरील त्यांच्या मेकअपवरी टिप्पणीवर स्पष्टीकरण दिले. "भाजपचे लोक प्रत्येक विधानाला ट्विस्ट करण्यासाठी ओळखले जातात. मी कंगनाचा अपमान केला नाही. ती अशा आपत्तीच्या वेळी त्या ठिकाणाला भेट देत नाही हा एक विनोद आहे आणि त्याऐवजी आमदार आणि अधिकारी तिला सांगत आहेत की हवामान खराब आहे. मतदारसंघात मृत्यू झाल्यास जबाबदारी टाळली जाते तेव्हा तिची संवेदनशीलता कुठे असते?," असं नेगी यांनी म्हटलं.