Himachal Pradesh Result: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपात कांटे की टक्कर, हे तीन उमेदवार ठरणार किंगमेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 10:04 AM2022-12-08T10:04:50+5:302022-12-08T10:05:59+5:30

Himachal Pradesh Assembly Elections 2022 Result: संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्षं लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे.

Himachal Pradesh Result: In Himachal Pradesh Congress-BJP clash, these three candidates will be the kingmakers | Himachal Pradesh Result: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपात कांटे की टक्कर, हे तीन उमेदवार ठरणार किंगमेकर

Himachal Pradesh Result: हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस-भाजपात कांटे की टक्कर, हे तीन उमेदवार ठरणार किंगमेकर

googlenewsNext

सिमला - संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्षं लागून असलेल्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. दरम्यान, गुजरातमध्ये भाजपाने निर्विवाद आघाडी घेतली आहे. तर हिमाचल प्रदेशमध्येकाँग्रेस आणि भाजपामध्ये अटीतटीची लढाई सुरू आहे. एकूण ६८ जागा असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये एकेका जागेसाठी लढाई सुरू आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार दोन्ही पक्षांना बहुमताचा आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे हिमाचल प्रदेशमध्ये सध्या मतमोजणीत आघाडीवर असलेले तीन अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीमध्ये पहिल्या दोन तासांनंतर समोर येत असलेल्या कलांमध्ये एकूण ६८ जागांपैकी ३३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसने ३२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर ३ जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. हिमाचल प्रदेशमधील डेहरा, नालागड आणि हमिरपूरम मतदार संघातून अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. डेहरामधून होशियार सिंह, नालागडमधून के.एल. ठाकूर आणि हमिरपूरमधून आशिष शर्मा आघाडीवर आहेत. हे तीनही अपक्ष उमेदवार हे भाजपामधील बंडखोर असल्याची माहिती समोर येत आहे.

२०१७ च्या निवडणुकीत भाजपाने ४४ जागा जिंकत स्पष्ट बहुमतासह विजय मिळवला होता. मात्र दर पाच वर्षांनी सत्तांतराची परंपरा असलेल्या हिमाचल प्रदेशमध्ये यावेळी भाजपामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली होती. भाजपामधील सुमारे २२ नेत्यांनी बंडखोरी करून निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली होती. त्यापैकी हे तीन उमेदवार आता मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. त्यामुळे आता त्रिशंकू निकाल लागल्यास हे अपक्ष उमेदवार जिंकून आल्यानंतर कुणाला पाठिंबा देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. 

Web Title: Himachal Pradesh Result: In Himachal Pradesh Congress-BJP clash, these three candidates will be the kingmakers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.