शरद गुप्तानवी दिल्ली :
हिमाचल प्रदेशात विधानसभेसाठी शनिवारी मतदान होणार असून, विधानसभेच्या मतदानावर सफरचंद उत्पादक शेतकरी प्रभाव टाकू शकतात. एकूण ६८ जागांपैकी सफरचंद शेतकरी किमान २५ जागांवरील निकाल प्रभावित करू शकतात.
वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांचा लाभ कमी होत आहे. कीटकनाशक व खतांच्या किमती मागील तीन वर्षांत दुप्पट झाल्या व पॅकिंग साहित्य २५ टक्क्यांनी महागले. याचमुळे त्यावरील जीएसटी १२ टक्क्यांवरून १८ टक्के केली जाईल. दुसरीकडे सफरचंदाच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल्या. शेतकऱ्यांचा लाभांश कमी झाला व शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. यामुळे यावेळी शेतकरी नाराज आहेत.
यामुळे दोन्ही काँग्रेस व भाजपने त्यांना आकर्षित करण्याची कोणतीही कसूर सोडलेली नाही. हिमाचलचे मूळ रहिवासी असलेले भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा व केंद्रीय माहिती प्रसारण व क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर हेही शेतकऱ्यांच्या भागांमध्ये पॅकिंग साहित्यावरील जीएसटी कमी करण्याचा वादा करत आहेत.
सफरचंदविक्रीतून ६ हजार कोटींची कमाईहिमाचल प्रदेशच्या अर्थव्यवस्थेचे आठ टक्के सफरचंद उत्पादनांतून येतात. देशात एकूण २४ लाख टन सफरचंद उत्पादन होते. त्यापैकी ६० टक्के उत्पादन हिमाचलात होते. राज्याचे शेतकरी सफरचंद विक्रीतून ६००० कोटी रुपये कमावतात.
छोट्या विधानसभा : एक समस्याहिमाचल प्रदेश छोटे राज्य आहे. येथील लोकसंख्या विखुरलेली असून, पर्वतीय भागांमध्ये राहते. बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये एक लाखापेक्षा कमी मतदार आहेत. अशा स्थितीत फार कमी मतांच्या फरकाने उमेदवाराचा विजय होतो. एक किंवा दोन हजार मतदानामुळे निवडणूक निकाल वेगळा लागू शकतो.
जीएसटी कमी करण्याची मागणीकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रियांका गांधी व हिमाचलचे काँग्रेस प्रभारी राजीव शुक्ला यांनी जीएसटी संपविण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने सफरचंद उत्पादकांच्या प्रतिनिधींबरोबर एक कृषी उत्पादन समिती गठीत करण्याचा वादा केला आहे. ही समिती किमती निश्चित करेल. पक्षाने सफरचंदाची किमान आधारभूत किंमत जाहीर करण्याची मागणी केलेली आहे. शेतकरीही कोणत्या पक्षाचे नेते काय आश्वासने देत आहेत, याकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
मोठ्या प्रमाणात उलाढालहिमाचल प्रदेशात यंदा रोखीच्या तुलनेत मौल्यवान धातूंची उलाढाल वाढली आहे. हिमाचल १३.९९ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त १८.७० रुपयांची दारू आणि ड्रग्ज जप्तगुजरात १.८६ कोटी रुपयांचे मौल्यवान धातू जप्त४.८० रुपयांची दारू आणि ड्रग्ज जप्तगुजरातमध्ये निवडणूक प्रक्रिया नुकतीच सुरू झाली