लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : तापमान वाढ, वितळणाऱ्या हिमनद्या, अतिवृष्टी आणि अनियंत्रित बांधकामांसह वाढते प्रदूषण या हवामान बदलांमुळे सिक्कीममध्ये आपत्ती आली. हिमनद्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे हिमालयात अशी आणखी संकटे येऊ शकतात, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये हवामान बदलामुळे अनेक हिमनद्या झपाट्याने वितळत आहेत. भूकंप आणि कार्बन उत्सर्जन त्यास हातभार लावत आहेत, असे पर्यावरणतज्ज्ञ अंजल प्रकाश म्हणाले.
तापमानवाढीचा धोका
पर्यावरण अभियंता मोहम्मद फारुक आझम यांच्या मते, हवामान बदलाचा दोन प्रकारे परिणाम होत आहे. सर्वप्रथम, जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळल्याने सरोवरे तयार होतात. जी अनेकदा धरणांद्वारे नियंत्रित केली जातात. सततच्या जागतिक तापमानवाढीमुळे सरोवरांचा आकार आणि संख्या दोन्ही वाढत आहे. २०१३ च्या केदारनाथ आपत्तीमध्येही अशीच परिस्थिती होती. जिथे चोराबरी तलाव ओव्हरफ्लो झाला होता.