Himanta Biswa Sarma: आसामच्या मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली, अमित शहांना पंतप्रधान तर मोदींना गृहमंत्री म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 11:20 AM2022-05-11T11:20:54+5:302022-05-11T14:06:11+5:30
Himanta Biswa Sarma: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे.
गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी काल गृहमंत्री अमित शहा यांना देशाचे पंतप्रधान आणि पंतप्रधान मोदी यांना गृहमंत्री म्हणून संबोधित केले. बिस्वा यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ असाम काँग्रेसने ट्विट केला आहे. 'भाजपने अमित शहा यांची देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून निवड केली आहे,' या कॅप्शनसह काँग्रेसने हा व्हिडिओ शेअर केला.
आसाम काँग्रेसने ट्विट केले की, "जेव्हा सर्बानंद सोनोवाल असामचे मुख्यमंत्री होते. तेव्हा खासदार पल्लब लोचन दास यांनी अनेकदा कॅबिनेट मंत्री हेमंत बिस्वा यांना असामचे मुख्यमंत्री म्हणून संबोधित केले होते. आता भाजपने नरेंद्र मोदींऐवजी पुढच्या पंतप्रधानाचा चेहरा निवडला आहे का? अमित शहा यांच्या पंतप्रधानपदाच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे."
When @sarbanandsonwal Ji was the CM, MP @pallablochandas on several occasions referred to cabinet minister @himantabiswa ji as the CM in public!
— Assam Congress (@INCAssam) May 10, 2022
Has #BJP decided its next @PMOIndia replacing @narendramodi Ji?
Or a campaign has been launched to promote @AmitShah ji as the PM? pic.twitter.com/BgqgbbajXC
भाजपने दिले स्पष्टीकरण
हेमंत बिस्वा यांनी अमित शहा यांना पंतप्रधान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गृहमंत्री म्हणून संबोधल्याबद्दल भाजपचे स्पष्टीकरण आले आहे. हेमंत बिस्वा यांची जीभ घसरली आणि ते चुकून असे बोलले, असे भाजपने म्हटले आहे.
गृहमंत्री आसाम दौऱ्यावर होते
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सोमवार आणि मंगळवारी दोन दिवसीय आसाम दौऱ्यावर गेले होते. यादरम्यान त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर जाऊन राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाचे उद्घाटन केले. यासोबतच बिस्वा यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात हेमंत सहभागी झाले होते. शाह यांनी गुवाहाटी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटीचेही उद्घाटन केले.