ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. ३ - हिंदू व विदेशात राहणारे भारतयी गोमांस खातात असा दावा राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. सभ्य लोक गोमांस खात नाही अशी उपरोधिक प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.
बिहारमधील दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या व बाळगल्याच्या संशयावरुन संतप्त जमावाने एकाची हत्या केली होती. या घटनेवर शनिवारी लालूप्रसाद यादव यांनी भाजपावर निशाणा साधला. भाजपाला देशभरात धर्मांधता पसरवायची आहे, ते धर्माचे राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला आहे. विदेशात राहणा-या गोमांस, मांस याच्याशी काहीच घेणेदेणे नसते, ते गोमांसही खातात असेही त्यांनी म्हटले आहे. लालप्रसाद यागव यांच्या विधानावर भाजपा नेते गिरीराज सिंह यांनी नाराजी व्यक्त केली आहे. लालूूप्रसाद यादव यांनी हिंदूंची माफी मागावी अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करु असा इशारा गिरीराज सिंह यांनी दिला आहे.