गुरगाव : गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या नुकताच जग्गा जासूस या चित्रपटातील अभिनेत्री बिदिशा बेजबारुआ हिने सोमवारी गुरगावमध्ये आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे. बिदिशा ही उत्तम गायिका व नर्तकीही असून, तिच्या मृत्यूचा नीट तपास व्हावा, अशी विनंती आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना केली आहे. ती मूळची आसामची असून, तिने आसामीमध्ये अनेक गाणीही गायली आहेत.सोमवारी संध्याकाळी गुरगावच्या सुशांतलोक भागातील इमारतीत तिचा मृतदेह सापडला. बिदिशा बेजबरुआने अनेक टीव्ही मालिकांमध्येही भूमिका केल्या होत्या. ती मुंबईतच राहत होती आणि काही दिवसांपूर्वीच ती आपल्या पतीसमवेत गुरगावला राहण्यास गेली होती. तिच्या वडिलांनी आपल्या मुलीच्या आत्महत्येस तिचा पती कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. त्याचे विवाहबाह्य संबंध होते आणि त्यातून तो तिला त्रास देत होता, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. बिदिशाने आत्महत्येच्या आदल्या दिवशी वडिलांना फोन केला होता, असेही कळते. आपण तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण अतिशय निराश असलेल्या बिदिशाने फोन बंद केला, असे ते म्हणाले.सोमवारी संध्याकाळपासून तिला फोन करत होते. पण ती फोनला उत्तर देत नव्हती. त्यावेळी काहीतरी घडले असावे, असा संशय तिच्या वडिलांना संशय आला. बिदिशा फोन उचलत नसल्याची माहिती व तिचा पत्रा तिच्या वडिलांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा घरचा दरवाजा आतून बंद होता. पोलीस दरवाजा तोडून आत गेले, तेव्हा त्यांना बिदिशाचा मृतदेह पंख्याला लटकलेला आढळून आला. पोलीस उपायुक्त दीपक सहारन यांनी ही माहिती दिली आहे. (वृत्तसंस्था)सुसाइड नोट नाहीबिदिशाने प्रेमविवाह केला होता, पण तिचे नवऱ्याशी नेहमी खटके उडत. बिदिशाचा मोबाइल फोन, फेसबुक आणि सोशल मीडियावरील सगळ्या अकाउंटवरच्या संभाषणांची सध्या तपासणी सुरू आहे. बिदिशाच्या मृतदेहाजवळ कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.
हिंदी चित्रपट अभिनेत्रीची गुरगावमध्ये आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 2:08 AM