ढाका : बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्यकांच्या हत्यांचे सत्र सुरूच असून शुक्रवारी एका हिंदू पुजारी व एका बौद्ध नेत्याची हत्या करण्यात आली, तर आणखी एक हिंदू व्यक्ती हल्ल्यातून थोडक्यात बचावला. मुस्लिमांचे प्राबल्य असलेल्या या देशात कट्टरवाद्यांनी अलीकडे अल्पसंख्यक आणि धर्मनिरपेक्ष कार्यकर्त्यांना लक्ष्य करून अनेक हल्ले केले आहेत. झैनिदाह येथे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी श्यामानंद दास यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. दास सकाळच्या पूजेसाठी राधामदन गोपाल मठात फुले गोळा होते. तेव्हाच हल्लेखोरांनी त्यांना गाठले. ५५ वर्षांच्या दास यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेपूर्वी संशयित इस्लामी कट्टरवाद्यांनी बंदरबर येथे बौद्ध नेते मोंग श्वे लुंग मरमा यांची हत्या केली. सम्शंखोला येथे धारदार शस्त्रानिशी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, असे नैखांगचारी पोलीस ठाण्याचे अधिकारी अब्दुल खैर यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)>हिंदू व अल्पसंख्य लक्ष्य देशात कट्टरवाद्यांनी हिंदू व अल्पसंख्यकांना लक्ष्य करण्याचे सत्र सुरू केले होते. ते रोखण्यासाठी पोलिसांनी देशव्यापी दहशतवादविरोधी मोहीम राबवली होती. या मोहिमेत अनेक संशयित कट्टरवादी व दहशतवादी पकडण्यात आले होते.
बांगलादेशात पुन्हा एका हिंदू पुजाऱ्याची हत्या
By admin | Published: July 02, 2016 6:02 AM