नवादा (बिहार) : दिल्लीजवळ दादरीतील बिसाला गावात गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून मोहम्मह अकलाख या इसमास जिवंत जाळले जाण्यावरून गेला आठवडाभर राजकीय वादळ उठले असूनही बाळगलेले मौन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सोडले आणि हिंदू व मुस्लिमांनी आपसात न झगडता गरिबीशी एकोप्याने लढा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.पाटणा येथील गांधी मैदानात आॅक्टोबर २०१३मध्ये मोदींच्या सभेपूर्वी बॉम्बस्फोट झाला होता. गुरुवारी बिहारमधील नवादा येथे एका निवडणूक प्रचारसभेत त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, ‘यापूर्वीही मी हे बोललो आहे व आता पुन्हा तेच सांगू इच्छितो. हिंदू व मुस्लिमांनी आपसात झगडायचे की गरिबीशी दोन हात करायचे याचा निर्णय आपण करायला हवा. हिंदू व मुस्लिमांनी एकोप्याने लढून गरिबीचे उच्चाटन करायला हवे.गोहत्याबंदी आणि गोमांस भक्षण यावरून दोन्ही बाजूंच्या राजकीय नेत्यांकडून प्रक्षोभक वक्तव्ये देऊन वातावरण तापविले जात असताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बुधवारी सहिष्णुता बाळगण्याचे आवाहन केले होते. त्याचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, राष्ट्रपतींचा हा संदेश हे एक देश म्हणून आपल्यासाठी सर्वोत्तम मार्गदर्शन आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर आपण मार्गक्रमण करायला हवे.सांप्रदायिक सलोखा, ऐक्य, बंधुभाव आणि शांतता यानेच देश पुढे जाऊ शकेल, यावर पंतप्रधानांनी भर दिला.राजकीय नेते आपापल्या स्वार्थासाठी हरतऱ्हेची वादग्रस्त विधाने करीत आहेत. परंतु लोकांनी त्याकडे दुर्लक्ष करावे, असे सांगून मोदी म्हणाले की, काही राजकारणी राजकीय फायद्यासाठी बेजबाबदार वक्तव्ये करीत आहेत... हे बंद व्हायला हवे. खुद्द मोदींनी अशी विधाने केली तरी लोकांनी त्याकडे लक्ष देऊ नये!लेखक ईश्वर यांची कार फोडलीअलापुझा : केरळमधील विविध महाविद्यालयांत दादरी हत्याकांडाच्या निषेधार्थ आयोजित करण्यात येत असलेल्या ‘गोमांस महोत्सवा’ला पाठिंबा देण्यास नकार दिल्याबद्दल काही विद्यार्थ्यांनी समाजसेवक आणि लेखक राहुल ईश्वर यांच्या कारची तोडफोड केली आणि त्यांचा रस्ता रोखला. पोलिसांनी कयामकुलामच्या मिलाद ई शेरीफ मेमोरियल कॉलेजच्या २५ विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गोमांस पार्टी देणाऱ्या आमदाराला मारहाणश्रीनगरमध्ये आमदार निवासात गोमांस पार्टीचे आयोजन करणारे अपक्ष आमदार शेख अब्दुल राशिद यांना गुरुवारी भाजपाच्या काही आमदारांनी जम्मू-काश्मीर विधानसभेतच मारहाण केली. या घटनेवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी प्रचंड गदारोळ करीत सभात्याग केला. भाजपा आमदारांनी राशिद यांना पकडून मारहाण सुरू केली, तेव्हा नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचे अनेक आमदार त्यांचा बचाव करण्यासाठी धावून आले.सैतानाने लालूप्रसादांनाच का गाठले?मुंगेर(बेगुसराय) : नवादा येथील रॅलीला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंगेर, बेगुसराय आणि समस्तीपूर येथील रॅलींना संबोधित केले. या वेळी राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या गोमांस खाण्याबाबतच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. माझ्या अंगात शिरलेल्या सैतानाने मला आक्षेपार्ह विधान करायला भाग पाडले, असा खुलासा लालूप्रसादांनी अलीकडे केला आहे. च्पण सैतानाला प्रवेश करण्यासाठी संपूर्ण जगात नेमके लालूप्र्रसाद यांचेच शरीर कसे मिळाले, सैतानाने त्यांनाच का गाठले असा उपरोधिक सवाल मोदींनी या वेळी केला. गोमांस खाण्याबाबतचे लालूंचे वक्तव्य यादवांना ‘शिवी’ देण्यासारखे आहे. हा यादवांचा अपमान आहे, असेही मोदी म्हणाले.च्हिंदू समाजातही गोमांस खातात, असे विधान अलीकडे लालूंनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे बिहारातील यादव समाज दुखावला होता. त्यामुळे हे विधान अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, माझ्या अंगात शिरलेल्या सैतानाने माझ्याकडून हे विधान वदवून घेतले, अशी सारवासारव त्यांनी केली होती.सैतानाने लालूप्रसादांनाच का गाठले?मुंगेर(बेगुसराय) : नवादा येथील रॅलीला संबोधित करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंगेर, बेगुसराय आणि समस्तीपूर येथील रॅलींना संबोधित केले. या वेळी राष्ट्रीय जनता दल(राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्या गोमांस खाण्याबाबतच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. माझ्या अंगात शिरलेल्या सैतानाने मला आक्षेपार्ह विधान करायला भाग पाडले, असा खुलासा लालूप्रसादांनी अलीकडे केला आहे. पण सैतानाला प्रवेश करण्यासाठी संपूर्ण जगात नेमके लालूप्र्रसाद यांचेच शरीर कसे मिळाले, सैतानाने त्यांनाच का गाठले असा उपरोधिक सवाल मोदींनी या वेळी केला. गोमांस खाण्याबाबतचे लालूंचे वक्तव्य यादवांना ‘शिवी’ देण्यासारखे आहे. हा यादवांचा अपमान आहे, असेही मोदी म्हणाले.हिंदू समाजातही गोमांस खातात, असे विधान अलीकडे लालूंनी केले होते. त्यांच्या या विधानामुळे बिहारातील यादव समाज दुखावला होता. त्यामुळे हे विधान अंगलट येण्याची चिन्हे दिसताच, माझ्या अंगात शिरलेल्या सैतानाने माझ्याकडून हे विधान वदवून घेतले, अशी सारवासारव त्यांनी केली होती.भागवतांच्या आरक्षण विचारांवर गप्प का?आरक्षण धोरणाची समीक्षा व्हावी, या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विचारावर मोदी गप्प का, ते भागवतांच्या या विचाराशी सहमत आहेत का?- लालूप्रसाद यादव
हिंदू-मुस्लिमांनी आपसात नव्हे, गरिबीशी लढावे!
By admin | Published: October 09, 2015 5:23 AM