बलशाली राष्ट्रासाठी हिंदूंनी एकजूट व्हावे-भागवत
By admin | Published: February 11, 2015 11:19 PM
खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
खरगोन : बलशाली राष्ट्र घडविण्यासाठी हिंदूंनी आपसातील सर्व मतभेद विसरून एकजूट केली पाहिजे, असे आवाहन रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.राष्ट्रहितासाठी सर्व हिंदू ज्यावेळी मतभेद विसरून एकत्र येतील तेव्हाच भारत खऱ्या अर्थाने समर्थ बनेल, असे भागवत म्हणाले. ते मंगळवारी महेश्वर येथे नर्मदा हिंदू संगम कार्यक्रमात बोलत होते.ते म्हणाले, भूतकाळात भारताला विश्वगुरू मानण्यात येत होते. भविष्यातही भारताची विश्वगुरू म्हणूनच ओळख निर्माण होईल. अमेरिकेकडे पैसा आणि व्यापार आहे. चीनकडे लष्करी शक्ती आहे. परंतु जगात भारतच असा एक देश आहे की ज्याच्याकडे सर्वकाही आहे.हिंदू समाजातीलच एका घटकाला मंदिरात प्रवेश करणे आणि सार्वजनिक विहिरीचे पाणी भरण्यास प्रतिबंध घालण्यासारख्या प्रथा सुरू असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. आपली कामे वेगवेगळी असली तरी आपण एकाच देवावर विश्वास ठेवतो आणि जगाला वसुधैव कुटुंबकम् मानतो. आता आपल्याला देशासाठी जगावे लागेल, असे भागवत म्हणाले.रविवारी स्वयंसेवकांना संबोधित करणाररा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांमध्ये ऊर्जेचा संचार करणे आणि त्यांच्याशी विचारमंथन करण्याच्या उद्देशाने मोहन भागवत हे येत्या १५ फेब्रुवारीला कानपूर येथे येणार आहेत. या दिवशी भागवत हे कानपूरच्या रेल्वे मैदानावर आयोजित विशेष शिबिरात २० हजारावर स्वयंसेवकांना संबोधित करतील. ते २० फेब्रुवारीपर्यंत कानपुरात मुक्काम करतील आणि या तीन दिवसांत विहिंप, बजरंग दल, मजदूर संघ व संघ परिवारातील अन्य संघटनांच्या नेत्यांसोबत विचारविमर्श करतील. (वृत्तसंस्था)