Hindustan Zinc Stake Sale: गेल्या काही वर्षात केंद्रातील भाजप सरकारने सरकारच्या मालकी असलेल्या अनेक कंपन्या विकल्या आहेत. यातच आता सरकारने आणखी एका कंपनीतील आपला हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. भारत सरकार 'हिंदुस्थान झिंक'मधील आपला संपूर्ण हिस्सा विकणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदुस्थान झिंकमधील 29.54 टक्के हिस्सा केंद्र सरकार विकणार असल्याचे मानले जात आहे. सरकारच्या हिस्सेदारीचे मूल्यांकन सुमारे 40,000 कोटी रुपये आहे. पूर्वी हिंदुस्थान झिंक ही सरकारी कंपनी असायची, पण 2002 मध्ये सरकारने अनिल अग्रवाल यांच्या वेंडा ग्रुपला 26 टक्के हिस्सा विकला. नंतर अनिल अग्रवाल यांची कंपनीतील भागीदारी 64.92 टक्क्यांपर्यंत वाढली. आता सरकार आपले उर्वरित 29.54 टक्के स्टेक विकण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे, येत्या काही दिवसांत सरकार ITC मधील 7.91 टक्के स्टेकदेखील विकू शकते.
हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये उसळीमंत्रिमंडळाच्या या निर्णयानंतर हिंदुस्थान झिंकचा शेअर 7 टक्क्यांनी वाढून 318 रुपयांवर पोहोचला आहे. सध्या हा शेअर 4.89 टक्क्यांच्या वाढीसह 310 रुपयांवर व्यवहार करत आहे. हिंदुस्तान झिंक हा जस्त, शिसे आणि चांदीचा देशातील सर्वात मोठा उत्पादक आहे.