शहरं
Join us  
Trending Stories
1
हे एका रात्री मिळवलेलं यश नाही! ऐतिहासिक विजयानंतर रोहित शर्माचे भावनिक स्पीच 
2
हा माझा शेवटचा वर्ल्ड कप! विराट कोहलीची मोठी घोषणा; रोहित शर्माबाबत मन जिंकणारे विधान 
3
India won World Cup : १७ वर्षानंतर आनंदोत्सव! रोहित शर्मा अन् भारताची वर्ल्ड कप विजयाची स्वप्नपूर्ती
4
रोहित शर्मा रडला, विराट अन् हार्दिकही रडला; बघा सूर्याच्या अफलातून कॅचने सामना फिरवला 
5
पुण्याची तुलना पंजाबशी नको, शहराचे नाव खराब होईल असे बोलू नका; मुरलीधर मोहोळांची विनंती
6
नजर हटी, दुर्घटना घटी! Axar Patel ने हलक्यात घेतले, क्विंटन डी कॉकने त्याला माघारी पाठवले
7
“सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जाण्याची वेळ आली आहे”; तीर्थदर्शन योजनेवर नाना पटोलेंची टीका
8
"आमचं ऐकलं नाही तर विधानसभा निवडणुकीत पराभूत करू’’, या राज्यात सरपंचांनी वाढवलं भाजपा सरकारचं टेन्शन
9
लेक लाडकी योजनेचे काय झाले? तुम्ही केलेले काम लोक विसरले वाटतेय का; वर्षा गायकवाडांचा शिंदेंना टोला
10
“राहुल गांधींना पंतप्रधानपदाचा चेहरा केले असते तर २५ ते ३० जागा वाढल्या असत्या”: संजय राऊत
11
संत ज्ञानेश्वर महाराजांचा प्रस्थान सोहळा संपन्न; उद्या सकाळी आजोळघरातून होणार प्रस्थान
12
“मनोज जरांगे हे तर राजकारणाचे आयकॉन, १० दिवसांत...”; अब्दुल सत्तार यांचे मोठे विधान
13
“काँग्रेसला जमत नाही म्हणून भाजपा-शिंदे गट सत्तेत आहे”; बच्चू कडूंचा खोचक टोला
14
माझं मन सांगतंय दक्षिण आफ्रिका जिंकायला हवी, पण...! Shoaib Akhtar चं फायनलपूर्वी मोठं भाकित
15
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर; माता भगिनींनी CM एकनाथ शिंदेंना बांधल्या राख्या
16
कर्नाटक काँग्रेसमध्ये कलह! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांमध्ये वाद?; डीके शिवकुमार यांनी कार्यकर्त्यांना दिल्या 'या' सूचना
17
"अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हा हक्कभंग’’, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप 
18
“लोकसभेत १५५ विधानसभा मतदारसंघात भाजपा पराभूत, इथे सत्ता बदलणारच...”: शरद पवार
19
भाजपातून जदयूत आले, नितीशकुमारांनी पक्षाचा कार्यकारी अध्यक्ष केले; उत्तराधिकारी की...?
20
बाईकची चाचणी देऊन मिळवलं क्रेन चालवण्याचे लायसन्स; अंधेरी RTO च्या भ्रष्टाचावरुन वडेट्टीवारांचे ताशेरे

फाईल सरकवणाऱ्यांना सज्जड इशारा

By admin | Published: October 01, 2015 2:59 AM

केवळ फाईल सरकवत जबाबदारी झटकू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक जबाबदार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतताच कंबर कसली आहे

हरीश गुप्ता,नवी दिल्लीकेवळ फाईल सरकवत जबाबदारी झटकू पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना अधिक जबाबदार ठरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदेश दौऱ्याहून परतताच कंबर कसली आहे. मंत्रिमंडळ सहकारी आणि नोकरशहांवर नियंत्रण ठेवण्यात ते कोणतीही कसर सोडत नाही, ही बाब सर्वज्ञात आहे. मंत्रिमंडळ सचिवालयाने बुधवारी जारी केलेले परिपत्रक त्याची साक्ष देणारे ठरावे.मंगळवारी रात्री आगमन झाल्यानंतर मोदींनी पुन्हा पकड घट्ट करताना सर्व मंत्रालये आणि विभागांना परिपत्रक पाठवून आंतर मंत्रालयीन सल्लामसलतीची प्रक्रिया दोन आठवड्यात पूर्ण करण्यास बजावले आहे. एकापेक्षा जास्त मंत्रालये आणि विभागांचा समावेश असलेल्या मुद्यांचा निपटारा करण्यास लागणारा विलंब कमी करण्याच्या उद्देशाने हे परिपत्रक जारी करण्यात आले. कोणताही निर्णय न घेता केवळ फाईल सरकवणारे मंत्री आणि अधिकाऱ्यांना त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला आहे. ३० सप्टेंबर रोजी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार ( क्रमांक १/५०/३/२०१५- कॅब) संबंधित मंत्रालय किंवा विभागाला कोणत्या दिवशी शेरा मागवण्यात आला आणि सल्लामसलत करण्यात आली ते नमूद करणे अनिवार्य करण्यात आले आहे.मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव कुणी ठेवला. संबंधित मंत्रालयाशी सल्लामसलत करण्यात आली काय? प्रस्तावात काय मागण्यात आले. त्याचे उत्तर मिळाले काय? त्यासंबंधी तारखेचा मंत्रिमंडळाच्या मसुदा टिपणात उल्लेख करणे आवश्यक राहील.