मुलीच्या लग्नाआधीच वडिलांचे निधन स्वप्न राहिले अधुरे : अंत्यसंस्कारानंतर दुसर्या दिवशी श्रीमंती पूजन
By admin | Published: July 13, 2016 11:11 PM
जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणार, त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने जोशी यांचे त्यात निधन झाले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले.
जळगाव: आपल्या डोळ्यादेखत पोटच्या मुलांचे लग्न व्हावे, आपल्या हातून मुलीचे कन्यादान व्हावे अशी प्रत्येक बापाची इच्छा असते, शशिकांत भास्कर जोशी (वय ७० रा.एसएमआयटी महाविद्यालय परिसर, जळगाव) या बापाची इच्छा मात्र अधुरी राहिली. मुलीला काही तासात हळद लागणार, त्याआधीच हृदयविकाराचा झटका आल्याने जोशी यांचे त्यात निधन झाले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर मोठे संकट कोसळले. शशिकांत जोशी यांच्या रोशनी या मुलीचा विवाह औरंगाबाद येथील संदीप या तरुणाशी निित झाला होता. १३ जुलै रोजी दुपारी १२.४० चा विवाहाचा मुहूर्त ठरला. आदल्या दिवशी संध्याकाळी सात वाजता श्रीमंती पूजनाचाही कार्यक्रम ठरला होता. सर्वत्र लग्नाची धामधूम, नातेवाईकांची रेलचेल, दोन्ही कुटुंबात आनंदाचा क्षण जवळ येत असतानाच मंगळवारी दुपारी साडे बारा वाजता जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यात त्यांचे निधन झाले. त्यामुळे काही क्षणातच आनंदावर विरजण पडले. लग्नाचा मुहूर्त निित झाला होता. नातेवाईकही आलेली होते. शिवाय खर्चही अमाप झालेला होता. या सार्या पेचात मुलीचे मामा अजय प्रल्हाद अत्रे यांनी विवाह ठरलेल्या वेळेत व्हावा म्हणून पुढाकार घेतला. संध्याकाळचे श्रीमंती पूजन रद्द करून साडे सात वाजता जोशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसर्या दिवशी अर्थात बुधवारी सकाळी साडे आठ वाजता श्रीमंती पूजन करण्यात आले व दुपारी ठरलेल्या वेळेवरच ब्रााण सभेत विवाह उरकण्यात आला. जोशी यांचा मोठा मुलगा दिनेश हा विवाहित आहे तर लहान जितेंद्र हा अविवाहित आहे. रोशनी ही दोन भावांची एकुलती बहीण आहे. कन्यादानाला बाप नसल्याचे दु:ख रोशनी व नातेवाईकांनी मोठ्या हिमतीने पचवले.