शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

देशासाठी ऐतिहासिक दिवस! नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 2:50 PM

New Parliament Building : जगभराशी तुलना केल्यास भारताची सध्याची गोल संसद इमारत ही तशी नवीनच आहे. तिला ९२ वर्षेच झाली आहेत. मोदींनी आज ९७१ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या संसद भवनाचे भूमिपूजन केले.

नवी दिल्ली : देशाचे सर्वोच्च प्रतिक असलेल्या नवीन संसद भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. हे नवीन संसद भवन २०२२ पर्यंत बांधून पूर्ण केले जाणार आहे.

जगभराशी तुलना केल्यास भारताची सध्याची गोल संसद इमारत ही तशी नवीनच आहे. तिला ९२ वर्षेच झाली आहेत. मोदींनी आज ९७१ कोटी रुपयांचा खर्च असलेल्या संसद भवनाचे भूमिपूजन केले. यावेळी गणेश पूजन व नंतर भूमीपूजन करण्यात आले. याचबरोबर विष्णूसह वराहचेही पूजन करण्यात आले. यावेळी सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते. 

नवे संसद भवन ६४,५०० चौरस  मीटर क्षेत्रफळावर बांधले जाणार असून या कामासाठी ९७१ कोटी रुपये खर्च येणार आहे. जुन्या संसद भवनाच्या इमारतीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. याच सुमारास नवीन संसद भवनाच्या बांधकामासही सुरुवात होणार आहे. हे आत्मनिर्भर भारताचे निदर्शक आहे.लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितले की, देशामध्ये जी सांस्कृतिक विविधता आहे, त्याचे चित्र नव्या संसद भवनात उमटणार आहे. देशाच्या ७५व्या स्वातंत्र्यदिनी संसदेचे अधिवेशन नव्या संसद इमारतीत होईल, अशी आशा करूया.  नव्या संसद भवनाची इमारत भूकंपरोधक असून तिथे १,२२४ खासदार एकत्र बसू शकतील, अशी व्यवस्था असेल. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील खासदारांसाठी सध्याच्या श्रमशक्ती भवनाच्या जागेवर कार्यालये बांधण्यात येणार आहेत. 

नवीन संसद भवनाच्या बांधणीत २ हजार प्रत्यक्षपणे तर ९ हजार लोक अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते.

 

सर्वोच्च न्यायालयाचा नकारसर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना नव्या संसद भवनाच्या भूमिपूजनाचा घाट घालणाऱ्या केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाने चांगलेच फटकारले होते. १० डिसेंबरचा भूमिपुजनाचा कार्यक्रम जरुर करा परंतू निकाल लागेपर्यंत बांधकाम सुरु करता येणार नाहीत असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयात या प्रकल्पावर आक्षेप घेणारी याचिका सादर झाली आहे. संसदेच्या पुन:बांधणीसंदर्भातील प्रकरण न्याप्रविष्ठ असताना केंद्राने या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम कसा आयोजीत होऊ शकतो? असा सवाल सुनावणी दरम्यान न्यायालयाने उपस्थित केला. त्यानंतर केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यामार्फत कोणतेही बांधकाम, तोडणे किंवा झाडे तोडल्या जाणार नाहीत अशी ग्वाही दिल्यानंतर न्यायालयाने आदेश मंजूर केला.

टॅग्स :ParliamentसंसदNarendra Modiनरेंद्र मोदीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय