अमरावती (आंध्र प्रदेश) - प्रत्येक राज्यात निर्माण होणाऱ्या रोजगारामधील मोठा तेथील भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे, असे नेहमीच बोलले जाते. मात्र त्या दिशेने अद्याप कुठल्याही सरकारने पाऊल उचलले नव्हते. दरम्यान, नुकतेच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झालेल्या जगनमोहन रेड्डी यांनी ऐतिहासिक निर्णय घेताना राज्यात भूमिपुत्रांना खासगी नोकऱ्यांमध्ये 75 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारची घोषणा करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
जगनमोहन सरकारने लागू केलेले खासगी क्षेत्रातील आरक्षण हे खासगी उद्योग, कंपन्या, कारखाने, संयुक्त उपक्रम तसेच सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातून विकसित होणारे उपक्रम यांना बंधनकारक असणार आहे. या ठिकाणी संबंधित उद्योजकांना आपल्याकडील नोकऱ्यांमध्ये 75 स्थानिकांना सामावून घ्यावे लागणार आहे. तसेच या खासगी उद्योगांना आणि कारखान्यांना सरकारकडून कुठल्याही प्रकारीच मदत मिळत नसली तरी त्यांना हे आरक्षण द्यावे लागे.