शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
2
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
3
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
4
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
5
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
6
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?
7
"एक हैं तो सेफ हैं"; पंतप्रधान मोदींची नवी घोषणा; म्हणाले, "आपल्याला एकत्र राहून..."
8
होणाऱ्या नवऱ्यासोबत फोनवर बोलत घराबाहेर पडली अन् जंगलात जाऊन...
9
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
10
PM Vidyalaxmi Scheme : काय आहे पीएम विद्यालक्ष्मी योजना? यासाठी कोण अर्ज करू शकतो? जाणून घ्या...
11
व्होट जिहादच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलं; किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार
12
देवेंद्र जी, आप भी चुनाव लड रहे है... मोदींनी नाव घेताच देवेंद्र फडणवीस धावत आले, धुळ्यातील सभेत काय घडलं?
13
SA vs IND : ऋतुराज गायकवाडला पुन्हा का वगळलं? भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचं मोठं विधान
14
ट्रम्प यांची एक घोषणा आणि Waaree Energies Shares आपटले; २ दिवसांत १०% ची घसरण
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
16
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
17
Wipro ला मिळाल्या २ ब्लॉक डील्स; ८.५ कोटी शेअर्सचं ट्रान्झॅक्शन; शेअर्सवर काय परिमाम होणार?
18
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
19
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
20
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा

ऐतिहासिक क्षण! देशाच्या नौदलात पहिल्यांदाच ३४१ महिला अग्निवीर रुजू 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 8:33 AM

२०४७ पर्यंत नौदल आत्मनिर्भर होईल. आम्ही हिंद महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत असं नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी सांगितले.

नवी दिल्ली : नौदलात प्रथमच महिलांना सहभागी करून घेण्यात आले आहे, अशी माहिती नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी दिली. अग्निवीर योजनेंतर्गत ३४१ महिला नौदलात दाखल झाल्या आहेत. पुढील वर्षीपासून नौदलात महिला अधिकाऱ्यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत नौदलात एकूण ३ हजार अग्निवीर सहभागी झाले.

नौदल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आर. हरी कुमार म्हणाले, आता नौदलातील सर्व शाखा सर्वांसाठी खुल्या राहतील. याशिवाय २०२३ मध्ये सर्व शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. नौदल प्रमुख हरी कुमार यांनी सरकारला आश्वासन दिले की, २०४७ पर्यंत नौदल आत्मनिर्भर होईल. आम्ही हिंद महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. भारत-चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताकडून आपले नेटवर्क मजबूत करण्यात येत आहे.

हरी कुमार यांनी सांगितले की, चीनवर लक्ष ठेवण्यासाठी भारत आता अमेरिकेकडून ड्रोन खरेदी करण्याची तयारी करीत आहे. ३ बिलियन अमेरिकी डॉलर खर्च करून भारत ३० एमक्यू-९ बी प्रिडेटर ड्रोन खरेदी करणार आहे. एमक्यू-९ बी ड्रोन हे एमक्यू-९ रीपरचा एक प्रकार आहे. यानेच अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल जवाहिरी याला ठार मारले होते. २०२० मध्ये भारतीय नौदलाने हिंद महासागरात पाळत ठेवण्यासाठी जनरल एटोमिक्सकडून दोन एमक्यू-९ बी सी ड्रोन एक वर्षासाठी भाड्याने घेतले होते आणि नंतर त्याची मुदत वाढविली होती. हिंद महासागरातील वाढत्या चिनी कारवाया पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. तीनही दलांना म्हणजे, लष्कर, हवाई दल आणि नौदल यांना प्रत्येकी १० ड्रोन मिळण्याची शक्यता आहे.