- शीलेश शर्मा
नवी दिल्ली : देशात हुकूमशाही असून काँग्रेस गप्प बसणार नाही. इतिहास खोटा ठरवला जात असून आमचा गंगा-यमुना संस्कृतीचा वारसा नष्ट करण्याचा प्रयत्न होत आहे, असे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटले.
काँग्रेस पक्षाच्या १३७व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी व्हिडीओद्वारे संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारचे नाव न घेता म्हटले की, “देशातील सामान्य व्यक्तीला असुरक्षित आणि भय वाटत आहे. लोकशाही आणि घटनेला बाजूला ठेवून हुकूमशाही कारभार सुरू आहे.”
सोनिया गांधी यांनी कठोर इशारा देत मोदी सरकारला म्हटले की, काँग्रेस देशाचा वारसा कोणालाही नष्ट करण्याची परवानगी देणार नाही. सामान्य माणसासाठी, लोकशाहीच्या संरक्षणासाठी आणि देशविरोधी, समाजविरोधी कारस्थानांविरोधात काँग्रेस संघर्ष करील. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा उल्लेख करून सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला त्या लढ्यात काँग्रेसची कोणती भूमिका होती याचे स्मरण करून दिले.
सोनिया गांधी म्हणाल्या, “स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस आणि त्यांचे अनेक नेते खूप सक्रिय होते, तुरुंगातील कठोर यातनांना सहन केल्या आणि बऱ्याच देशभक्तांनी आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदानही केले.