भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये सत्तासंघर्षाने शेवटचे टोक गाठले आहे. ज्योतिरादित्य सिंधियांनी राजीनामा पोस्ट करताच काँग्रेसने त्यांच्या हकालपट्टीचीच घोषणा केली आहे. पण हा सत्तासंघर्ष मध्य प्रदेशवासियांसाठी नवा नाही. कारण मध्य प्रदेशचे राजकारण सिंधिया राजघराण्याच्या भोवती फिरत राहिलेले आहे.
गेल्या 15 वर्षांपासूनचे भाजपाचे सरकार उलथवून काँग्रेसने काठावर बहुमत मिळवत मध्य प्रदेशमध्ये सत्ता स्थापन केली होती. मात्र, कमलनाथ यांचे सरकार अल्पायुषी ठरताना दिसत आहे. कारण काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी बंडखोरी केली असून 6 मंत्र्यांसह 17 आमदारांना कर्नाटकात नेऊन ठेवले आहे. इतिहासामध्ये डोकावल्यास सिंधिया राजघराण्यापासून बंडखोरी होणे हे काही नवे नाही. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या वडिलांनीही त्यांच्या आई राजमाता विजयाराजे सिंधिया यांच्याशी बंडखोरी करून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेत खुद्द राजमाता विजयाराजे यांनीदेखील 10 वर्षे काँग्रेसकडून खासदारकी उपभोगून जनसंघाची कास धरली होती.
विजयाराजे यांनी काँग्रेसचे सरकार पाडले होते. गोविंद नारायण सिंह यांना मुख्यमंत्री केले होते. राजमाता विजयाराजे यांनी जनसंघाद्वारे 1971 मध्ये भाजपाचे लाटेविरोधात तीन खासदार निवडून आणले होते. यामध्ये अटल बिहारी वाजपेयींना संसदेवर जायची संधी मिळाली होती. याच मार्गावर आता ज्योतिरादित्य सिंधिया जाताना दिसत आहेत. मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे कमलनाथ सरकार अल्पमतात आले आहे.
राजीनामा नाही, काँग्रेसने हकालपट्टी केली; ज्योतिरादित्यांवर ठेवला गंभीर आरोप
5000 वर्षांपूर्वीच्या लाकडापासून बनविली Bentley ने कार; किंमत ऐकून व्हाल गारआणीबाणीने कुटुंब फोडलेले, ज्योतिरादित्य सिंधिया आज जोडणार; राजमातेचे स्वप्न पूर्ण करणार