Hit and Run Case: केंद्र सरकारने हिट अँड रनचा कायदा अधिक कडक केला आहे. नवीन कायदा सर्व वाहनांना लागू होणार आहे. मग ती कार असो, दुचाकी असो किंवा ट्रक किंवा टँकर असो. नवीन कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणात चालकाला 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 5-7 लाखांचा दंड ठोठावला जाईल. याविरोधात देशभरात ट्रक चालक सोमवारपासून संपावर गेले आहेत. दरम्यान, आता जगातील अनेक देशांमध्ये हिट अँड रन प्रकरणात भारतापेक्षाही कडक तरतुदी करण्यात आलेल्या आहेत.
UAE: 56 लाखांचा दंड अन्...संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE मध्ये अशा घटनांमध्ये कठोर कारवाई केली जाते. येथे, हिट अँड रनच्या बाबतीत कायदा म्हणतो की, चालकाने सर्वप्रथम वाहनाशी संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सुपूर्द केली पाहिजेत. घटनास्थळी पोलिस नसतील तर घटना घडल्यापासून 24 तासांच्या आत घटनेची माहिती पोलिस ठाण्यात द्यावी लागेल. माहिती उशिरा दिल्यास त्याचे कारणही स्पष्ट करावे लागेल. या घटनेत कोणी जखमी झाले किंवा मरण पावले तर पोलीस चालकाला अटक करतील. दोषी सिद्ध झाल्यास त्याला तुरुंगवास किंवा 25 हजार दिरहम, म्हणजेच 56 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड होऊ शकतो. मद्य सेवनाची पुष्टी झाल्यास दंड आणखी वाढवला जाऊ शकतो.
सौदी अरेबिया: 4 वर्षे तुरुंगवास किंवा 44 लाख रुपये दंडसौदी अरेबियात अपघातातमृत्यू झाल्यास चालकाला चार वर्षांचा तुरुंगवास किंवा 44,44,353 रुपये दंड आकारला जातो. सौदी अरेबियाच्या ट्रॅफिक रेग्युलेशनमध्ये असे म्हटले आहे की जर एखाद्या अपघातामुळे कोणी जखमी झाला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेले तर दोषी ड्रायव्हरला 2 वर्षांचा तुरुंगवास आणि 22,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल.
कॅनडा: जखमी झाल्यास 5 वर्षे आणि मृत्यू झाल्यास जन्मठेपकॅनडाच्या कायद्यानुसार, अशा प्रकरणात कोणी जखमी झाल्यास दोषी चालकाला 5 वर्षांची शिक्षा होईल. अपघातात एखाद्याचा मृत्यू झाल्यास दोषी चालकाला जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागेल.
अमेरिका: दंडासह 10 वर्षे तुरुंगवासअमेरिकेतील वेगवेगळ्या राज्यांमध्ये याबाबत वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये, अशा प्रकरणांमध्ये ड्रायव्हरची चुकी आढळल्यास त्याला दंडासह 10 वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो.
ब्रिटन: 6 महिने तुरुंगवास आणि अमर्यादित दंडब्रिटनमध्ये अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळी उपस्थित आहे की, पळून गेला, यावर शिक्षा ठरलेली असते. आरोपीकडून अमर्यादित दंड वसूल केला जाऊ शकतो. याशिवाय 6 महिन्यांची शिक्षा होऊ शकते. गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार 5 ते 10 पेनल्टी पॉइंट्स ठरवले जातात. यावर अवलंबून शिक्षा कमी-अधिक असू शकते.