शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

'हिट अँड रन' प्रकरणात मृत्यू झाल्यास कुटुंबाला मिळणार 8 पट अधिक नुकसान भरपाई!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 11:28 AM

Hit & run : 'हिट अँड रन' प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात येणारी भरपाई आता 1 एप्रिलपासून आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्यात येत आहे. 

नवी दिल्ली : अपघातांच्या वाढत्या प्रमाणाच्या पार्श्वभूमीवर  'हिट अँड रन' (Hit And Run) प्रकारात मृत्यूमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईत वाढ होणार आहे. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. 'हिट अँड रन' प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना देण्यात येणारी भरपाई आता 1 एप्रिलपासून आठ पटीने वाढवून 2 लाख रुपये करण्यात येत आहे. 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Road Transport and Highways) अधिसूचनेत ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, अशा प्रकरणांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला मिळणारी नुकसान भरपाई देखील 12,500 रुपयांवरून 50,000 रुपये करण्यात आली आहे.

या योजनेला 'हिट अँड रन मोटार अपघात पिडीत भरपाई योजना, 2022 '(Compensation to Victims of Hit and Run Motor Accidents Scheme, 2022) असे म्हटले जाऊ शकते आणि ती 1 एप्रिल 2022 पासून लागू होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, एका प्रसिद्धीपत्रकानुसार, मंत्रालयाने रविवारी सांगितले की, 25 फेब्रुवारी 2022 रोजी हिट अँड रन मोटार अपघातातील पीडितांना भरपाईची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. 

भरपाई 8 पट वाढलीगंभीर जखमींसाठी भरपाईची रक्कम वाढवून 50,000 रुपये करण्यात आली आहे, तर मृत्यूच्या बाबतीत सध्याच्या 25,000 रुपयांवरून 2,00,000 लाख रुपये अशी भरपाईची रक्कम वाढवण्यात आली आहे. मंत्रालयाने प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटले आहे की, "ही योजना 1 एप्रिल 2022 पासून लागू होणारी भरपाई योजना, 1989 ची जागा घेईल." तसेच, प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, नुकसान भरपाईसाठी अर्ज करणे आणि पीडितांना मोबदला जाहीर करणे या प्रक्रियेसाठीही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.

टॅग्स :Accidentअपघात