श्रीनगर - एकीकडे कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत असताना दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्ये वाढत्या उन्हाळ्यासोबत दहशतवादी कारवायांनाही जोर आला आले. भारतीय लष्कराकडून दहशतवाद्यांचा बीमोड करण्यासाठी जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. आज पुलवामा येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकू याचा खात्मा केला आहे. याशिवाय अवंतीपोरा येथील शरशाली खिरयू भागात झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून श्रीनगरमधील मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
आज सकाळपासून जम्मू काश्मीरमधील दोन ठिकाणी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये अवंतीपोरा येथे लष्कराने दोन दहशतवाद्यांना ठार केले. तर पुलवामा येथील बेगीपोरा भागात हिज्बुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज नायकू याचा शोध घेण्यासाठी लष्कराकडून घेराव घालण्यात आला होता. दरम्यान, तिथे झालेल्या चकमकीत लष्कराने रियाज नायकू याला कंठस्नान घातले.
रियाज नायकू हा हिज्बुल मुजाहिद्दीनच्या जम्मू काश्मीरमधील टॉप कमांडरपैकी एक होता. लष्कराने त्याच्यावर १२ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. काही काळापूर्वी सब्जार बट याचा मृत्यू झाल्यानंतर रियाज याला हिज्बुलचा कमांडर बनवण्यात आले होते. रियाज नायकू कुख्यात दहशतवादी बुऱ्हान वानी याच्या कोअर ग्रुपचा सदस्य होता.
महत्त्वाच्या बातम्या
coronavirus: कोरोनामुळे संकटात रोजगार, या योजनेंतर्गत दोन वर्षे खात्यात पैसे जमा करणार मोदी सरकार
बाळासाहेब, इंदिरा, पवार, लालूप्रसाद... राज ठाकरेंनी शेअर केली स्वतः काढलेली दुर्मिळ अर्कचित्रं
coronavirus: अजबच! या देशात माणसांसोबत बकरी आणि फळेही कोरोना पॉझिटिव्ह
दरम्यान, जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे परवा झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुरक्षा दलांच्या एकूण पाच जवानांचा मृत्यू झाला होता. तर त्यानंतर झालेल्या अजून एका चकमकीत तीन जवानांना वीरमरण आले होते.