श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे इरफान अहमद भट व शाहिद अहमद मीर हे दहशतवादी ठार झाले.खुदपोरमध्ये काही दहशतवादी लपून बसले असल्याची खबर मिळाल्यामुळे सुरक्षा दलांनी या भागात शनिवारी संध्याकाळी शोधमोहिम हाती घेतली.त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर गोळीबार केला. त्याला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन दहशतवादी ठार झाले व आणखी दोन जण तेथून पळून गेले.भट हा गेल्या वर्षी दहशतवादी कारवायांत सामील होता. मीरवर २००४ सालातील एका शस्त्रचोरी प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोघांकडून काही शस्त्रे व दारूगोळा जप्त करण्यात आला. शाहिद मीर हा गागरान गावचा तर भट हा बांडझू गावचा रहिवासी आहे.सुरक्षा दलाकडून अधिक दक्षताकाश्मीरमध्ये हिवाळ््याच्या आधी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणावर घुसखोरीचे प्रयत्न होतात. हिवाळा सुरू झाला की, हिमवृष्टीमुळे घुसखोरीचे मार्ग नोव्हेंबर ते मे या काळात बंद होतात. घुसखोरी करून आलेल्या दहशतवाद्यांच्या घातपाती कारवाया हाणून पाडण्यासाठी सुरक्षा दले सज्ज असतात पण हिवाळ््यात तर त्याबाबत अधिक काळजी घेतली जाते.
काश्मीरमध्ये हिजबुलच्या दोघांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2018 5:48 AM