अमृतसर : समाजमाध्यमाद्वारे प्रेम जुळलेल्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानात बेकायदेशीररित्या गेलेल्या हमीद निहाल अन्सारी या भारतीय तरुणाची मंगळवारी सहा वर्षांनी मुक्तता करण्यात आली. त्याला पाकिस्तानने मंगळवारी संध्याकाळी वाघा सीमेवर भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली केले.
त्यावेळी त्याचे वडील निहाल, आई फौजिया व हमीदच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करणारे सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार जतीन देसाई असे सारेच भावूक झाले होते. जतीन देसाई यांनी लोकमतला सांगितले की, हमीदने भारतीय हद्दीत प्रवेश (पान ११ वर)बीटिंग द रिट्रीटनंतर ताबावाघा सीमेवर भारत व पाकिस्तानी लष्करामध्ये दररोज संध्याकाळी बिटिंग द रिट्रीट हा सोहळा होतो. त्यावेळी दोन्ही बाजूला काही हजार प्रेक्षक तिथे जमा झालेले असतात. हा सोहळा संपल्यानंतर हमीद याला पाकिस्तानने भारताच्या ताब्यात दिले.