शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
4
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
5
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
6
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
7
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
8
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
9
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
10
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
11
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
12
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
13
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
14
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
15
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
16
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
17
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
18
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
19
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
20
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य

HMPV Virus: भारतात HMPV चा तिसरा रुग्ण, अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या मुलाला संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 14:49 IST

HMPV cases in India : सध्या या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

HMPV cases in India :  चीनमध्ये मोठ्या संख्येने मुलांना या व्हायरसची लागण होत आहे. रुग्णालयांमध्ये लांबच लांब रांगा लागल्याचे दावे केले जात आहेत. दरम्यान, भारतातही या नवीन व्हायरसची प्रकरणे दिसू लागली आहेत. गुजरातमधील अहमदाबाद येथील एका दोन महिन्यांच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या या मुलावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

आतापर्यंत भारतात तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातव्यतीरिक्तकर्नाटक या एकाच राज्यात दोन रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकात एक तीन महिन्यांची मुलगी आणि दुसरा ८ महिन्यांच्या मुलाचा यात समावेश आहे. या व्हायरसमुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रवासाचा कोणताही इतिहास नाही.

गुजरात सरकारच्या आरोग्य विभागाने HMPV व्हायरसबाबत विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सातत्याने वाढत असलेल्या प्रकरणांमुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. यामुळे आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. देशभरात आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. 

दरम्यान,  HMPV सहसा फक्त लहान मुलांमध्ये आढळतो. सर्व फ्लू नमुन्यांपैकी ०.७ टक्के HMPV चे असतात. तसेच, या व्हायरसचा स्ट्रेन काय आहे? हे अद्याप समजलेले नाही. अशा परिस्थितीत आरोग्य तज्ज्ञांनी या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी दक्षता आणि सार्वजनिक आरोग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, लोकांना हात धुणे आणि मास्क वापरण्याचा आणि इतर खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

HMPV  म्हणजे काय?ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) हा RNA व्हायरस आहे, जो Pneumoviridae कुटुंबातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी याचा प्रथम शोध लावला होता. हा व्हायरस प्रामुख्याने श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो आणि खोकल्यामुळे किंवा शिंकण्याद्वारे पसरतो. संक्रमित लोकांच्या संपर्कात आल्याने देखील ते वेगाने पसरू शकते. त्याच्या संसर्गाचा कालावधी ३ ते ५ दिवसांचा असतो आणि हिवाळ्यामध्ये हे सर्वात सामान्य आहे.

टॅग्स :HMPV Virusह्युमन मेटापन्यूमोव्हायरसHealthआरोग्यGujaratगुजरातKarnatakकर्नाटकIndiaभारतchinaचीन