शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
2
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
3
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
4
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
5
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
6
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
7
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
8
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
9
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
10
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
11
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
12
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
13
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
14
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
15
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

३० सप्टेंबरपर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका घ्या; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2023 12:59 PM

संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता असं कोर्टाने सांगितले.

नवी दिल्ली - जम्मू काश्मीरातील कलम ३७० हटवणे वैध की अवैध यावर सुप्रीम कोर्टाने आज महत्त्वाचा निकाल दिला. जम्मू काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे. त्याठिकाणी कलम ३७० हटवले ते वैध असल्याचे सुप्रीम कोर्टाने शिक्कामोर्तब केले. परंतु त्याचसोबत जम्मू काश्मीरात ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत विधानसभा निवडणुका घेण्यासाठी कार्यवाही करावी आणि जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा द्यावा असे निर्देश कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. 

कलम ३७० वर निकाल सुनावताना सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड म्हणाले की, जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा परत द्यायला हवा. परंतु लडाख केंद्रशासित प्रदेश कायम राहील. निवडणूक आयोगाने नवीन सीमारचनेच्या आधारे विधानसभा निवडणुका घ्याव्यात. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत याठिकाणी विधानसभा निवडणूक घ्यावी. जितकं शक्य असेल तितक्या लवकर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जावा असं कोर्टाने सांगितले. 

तसेच संविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होती. राष्ट्रपतींकडे कलम ३७० रद्द करण्याचा अधिकार होता. जम्मू काश्मीरपासून लडाख स्वतंत्र्य करण्याचा सरकारचा निर्णय वैध आहे असं कोर्टाने म्हटलं. १६ दिवसांपासून सुरू असलेल्या घटनापीठाच्या सुनावणीनंतर ५ सप्टेंबरला सुप्रीम कोर्टाने यावरील निकाल राखून ठेवला होता. या प्रकरणी एकूण २३ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्यात राजकीय नेते, सामाजिक संघटना, पत्रकार आणि कार्यकर्ते यांचा समावेश होता. 

सुप्रीम कोर्टाने काय काय म्हटलं?राष्ट्रपती राजवटीच्या घोषणेला आव्हान देणे वैध नाहीसंविधानात कलम ३७० ही तात्पुरती तरतूद होतीसंविधान सभा भंग झाल्यानंतरही राष्ट्रपतींच्या आदेशावर कुठलीही बंधने नाहीतराष्ट्रपतींच्या अधिकाराचा गैरवापर झाला नाही त्यामुळे राज्याची सहमती घेण्याची आवश्यकता नाहीजम्मू काश्मीरातून लडाख केंद्र शासित बनवणे वैध जम्मू काश्मीरला लवकरात लवकर राज्याचा दर्जा देऊन इथं निवडणूक घेण्यात यावी 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरElectionनिवडणूकSupreme Courtसर्वोच्च न्यायालय