नागरिकत्व कायद्याविरोधात काँग्रेसचे राजघाटावर धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 07:27 AM2019-12-24T07:27:09+5:302019-12-24T07:27:28+5:30
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी
प्रकृती बरी नसतानाही काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी सोमवारी दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत राजघाटावरील धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यांना थंडीचा त्रास होऊ नये, म्हणून राहुल गांधी यांनी त्यांच्या अंगावर काळजीपोटी व प्रेमाने शाल पांघरली.
सोनिया गांधींसह अनेक ज्येष्ठ नेत्यांची हजेरी
नवी दिल्ली : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) विरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी येथील राजघाटवर धरणे आंदालन आयोजित करण्यात आले होते. हजारो काँग्रेस कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, सरचिटणीस प्रियंका गांधी, राहुल गांधी यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.
अंमलबजावणी नाही
यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपल्या राज्यात नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी केली जाणार नाही, असे जाहीर केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही यावेळी राज्यात हा कायदा लागू न करण्याची घोषणा केली.