होळीच्या रंगात रंगून जायला कोणाला आवडत नाही? पण, झारखंडमध्ये असेही एक गाव आहे ज्या गावात १०० वर्षांपासून होळी साजरी केली जात नाही. झारखंडजवळ दुर्गापूर गावात होळीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा शांतता पसरली आहे. यामागचे कारण असे सांगितले जाते की, दुर्गापूरमध्ये दुर्गाप्रसाद नावाचा राजा राज्य करत होता. या गावात मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात असे. मात्र, होळीच्या दिवशी राजाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर जेव्हा या गावात होळी साजरी केली जात असे तेव्हा साथरोग किंवा दुष्काळाचे सावट असायचे. त्यामुळे अनेक लोकांचा साथरोगात मृत्यू झाला. त्यामुळे त्रस्त झालेल्या राजाने होळी साजरी न करण्याचा आदेश दिला. गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात की, दुर्दैवाने राजाचा मृत्यूही एका युद्धात होळीच्या दिवशीच झाला. त्यानंतर मात्र या गावात होळी साजरी करणे बंद झाले. काही जणांचे असे म्हणणे आहे की, राजाच्या भूताच्या भितीनेही येथे होळी साजरी केली जात नाही.
या गावात साजरी होत नाही होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 5:51 AM