मुंबई : होळीचा उत्सव म्हणजे रंगाचा आणि प्रेमाचा उत्सव. होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. तसंच होळीच्या दिवशी आयोजित केल्या जाणाऱ्या पार्टींमध्ये रंगाबरोबर खेळून नंतर गाण्यांवर डान्स करण्याची इच्छा प्रत्येकाला असते. हिंदी चित्रपटसृष्टीने आपल्याला अनेक होळीनिमित्त खास गाण्यांचा संच दिला आहे. त्यापैकी काही गाणी अजूनही तितकीच प्रसिद्ध आहेत. म्हणून यंदाही होळीच्या या ८ प्रसिद्ध गाण्यांवर थिरकायला तयार राहा.
१) रंग बरसे
'रंग बरसे भीगे चुनरवाली' हे प्रसिद्ध होळीचं गाणं १९८१ साली प्रदर्शित झालेल्या 'सिलसिला' या चित्रपटातील आहे. या चित्रपटातील अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या अभिनयाने या गाण्याची प्रसिद्धी वाढली होती. तसंच इतकी वर्ष होऊनही या गाण्याला होळीच्या गाण्यांमध्ये पहिली पसंती दिली जाते.
२) बलम पिचकारी
'बलम पिचकारी' हे गाणं 'यह जवानी है दिवानी' या चित्रपटातील असून दीपिका आणि रणबीर कपूर यांच्यावर चित्रित केलेलं आहे. शाल्मली खोलगडे आणि विशाल दादलानींनी संगीतबद्ध केलेलं गाणं नवीन होळीच्या गाण्यांपैकी एक उत्कष्ट गाणं आहे.
३) खेलेंगे हम होली
लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी संगीतबद्ध केलेलं व 'कटी पतंग' या चित्रपटातील राजेश खन्ना आणि आशा पारेख यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं १९७० साली प्रदर्शित झालं असलं तरी नवीन चालींच्या गाण्यांना तितकंच आव्हान देणारे आहे.
४) होली खेले रघुवीरा
अमिताभ बच्चन यांना बॅालिवूडच्या कारकिर्दित बऱ्याच होळींच्या गाण्यावर आपण थिरकताना पाहिलं आहे. पण हे गाणं उदित नारायण, सुखविंदर सिंग, अलका यागनिक यांच्यासोबत अमिताभ यांनीही गायलं आहे. 'बागबान' या चित्रपटातील हे गाण असून हेमा मालिनी आणि अमिताभ यांनी या गाण्यात वेगळीच मजा आणली आहे.
५) डू मी अ फेवर लेट्स प्ले होली
अनु मलिक आणि सुनिधी चौहान यांनी गायलेलं हे गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालं होतं. तसंच थोडं हॅालिवूडचा अंदाज दिलेलं हे गाणं प्रत्येक होळीच्या गाण्यांच्या लिस्टमध्ये असतंच. २००५ नंतर प्रत्येक वर्षी होळीच्या गाण्यांमध्ये या गाण्याचा समावेश असतोच.
६) होली के दिन
शोले चित्रपटातील हे गाणं धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या नृत्यामुळे प्रसिद्धीस आलं होतं. होळीच्या जुन्या गाण्यांपैकी सर्वांच्या आवडीचं असं हे गाणं एकल्यावर नाचण्याचा मोह आवरत नाही. तसंच किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी हे गाणं गायल्यामुळे या गाण्यात वेगळीच मजा आहे.
७) गो पागल
''जॅाली एलएल बी' या चित्रपटातून होळीच्या दिवशी करण्यात येणारी मजा या गाण्यातून हुमा कुरेशी आणि अक्षय कुमार यांनी दाखवली आहे. तसंच उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे होळी साजरी करतात त्याप्रमाणे ह्या गाण्यात रंगांची उधळण दाखवण्यात आली आहे.
८)हम तेरे दिवाने है
शाहरूख खानने 'मोहब्बते' चित्रपटातील या गाण्यातून होळीच्या निमित्ताने आपण प्रेमही व्यक्त करू शकतो असं दाखवलं. तसंत तरूणांनी होळीची मजा घेत आपल्या आयुष्यालाही नवनवे रंग देण्याची गरज असते असा सल्लाही या गाण्यातून दिला आहे.