नवी दिल्ली - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात २०२२ पर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे दिलेले आश्वासन पूर्णपणे अशक्य आहे. हे आश्वासन निव्वळ पोकळ आहे, देशाचा विकास दर १२ टक्के वर पोहचल्यानंतरच हे गाठता येतील, अशी टीका माजी पंतप्रधान आणि जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंह यांनी केली.अर्थसंकल्पानंतर शनिवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. सिंह म्हणाले की, केवळ आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून हा अर्थसंकल्प मांडला आहे, अशी मी टीका करणार नाही परंतु मूळ घोटाळा वा चलाखी सरकारच्या वित्तीय अंकगणितामध्येच आहे. हा अर्थ संकल्प खूप मोठे स्वप्न जरुर दाखवतो, परंतु ते वित्तीय आकडेवारीत कसे बसवणार, हे अर्थमंत्री सांगू शकलेले नाहीत.
शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन पोकळ डॉ. मनमोहन सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 1:38 AM