पान ६ दस्ताकार समितीतर्फे गृह सजावट वस्तूंचे प्रदर्शन
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
पर्वरी येथे आजपासून प्रारंभ
पर्वरी येथे आजपासून प्रारंभपर्वरी : भारतात अनेक प्रतिष्ठित बिगर सरकारी संस्था आहेत, ज्या विविध उपक्र मांतून अर्थार्जन करून गरजूंना मदत करतात. अशीच एक अखिल भारतीय दस्ताकार समिती संस्था असून देशभरातील विविध राज्यांतील कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पादनांची विविध राज्यांत प्रदर्शने भरवीत असते. यंदा गोव्यात येथील क्षात्रतेज संकुलात समितीने दि. २१ ते दि. ३१ डिसेंबरपर्यंत गृह सजावट वस्तूंच्या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत समितीचे अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी दिली.पर्वरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस केंद्रीय कापड उद्योग केंद्राचे गोव्यातील अधिकारी सुरेश तोरस्कर, कपिल शर्मा आणि मुनेन्द्र सिंग उपस्थित होते. केंद्रीय कापड उद्योग मंत्रालयाच्या मदतीने देशभरातील सुमारे ७० कारागीर आपले कौशल्य या प्रदर्शनात दाखवणार आहेत. टेराकोट, हस्तकला, वीणकाम, चर्म वस्तू तसेच ज्वेलरी समीस आणि नूतन वर्षासाठी लागणारी गृह सजावटीसारखी उत्पादने येथील ग्राहकांना उपलब्ध असतील. तर त्यावर २५ टक्केपर्यंत सूट असेल. यापूर्वी समितीने दिल्ली, पुणे, मुंबई, हैदराबाद, उज्जैन, इंदोर, चंदिगड सारख्या मोठ्या शहरांत प्रदर्शने भरविली आहेत, असे अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी सांगितले. ही समिती गरजंूना तसेच अशिक्षित महिलावर्गाला मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रेरित करत असल्याचे सिंग यांनी सांगितले. केंद्रीय कापड उद्योग केंद्राचे गोव्यातील अधिकारी सुरेश तोरस्कर यांनी गोव्यात समितीला लागणारी सर्व मदत देण्यात येईल तसेच येथील ग्राहकांना आवश्यक वस्तू वाजवी दरात मिळाव्या हा हेतू समितीचा आहे, असे सांगितले. (प्रतिनिधी)फोटो: पत्रकारांना माहिती देताना दस्ताकार समितीचे अध्यक्ष इक्बाल सिंग. सोबत इतर मान्यवर. (छाया : शेखर वायंगणकर)