शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गृहकर्ज इच्छुक वाढले

By admin | Published: January 09, 2017 1:26 AM

एसबीआय बँकेने गृह कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर या कर्जाबाबत नागरिकांतून तीन पट अधिक चौकशी वाढली आहे.

हैदराबाद : एसबीआय बँकेने गृह कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर या कर्जाबाबत नागरिकांतून तीन पट अधिक चौकशी वाढली आहे. बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. गत आठवड्यात बँकेने गृह कर्जाच्या दरात ०.९० टक्के कपात केली आहे. याशिवाय इतर बँकांनीही व्याजदर कमी केल्याने कर्ज घेण्यासाठीच्या इच्छुकांची संख्या वाढल्याचे चित्र आहे. एसबीआयच्या नॅशनल बँकिंगचे व्यवस्थापकीय संचालक रजनीश कुमार यांनी सांगितले की, ८ नोव्हेंबरच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर कर्जाच्या मागणीत वाढ झालेली दिसत नाही. पण, मागच्या आठवड्यात बँकेने कर्जाच्या दरात कपात केल्यानंतर प्रत्यक्ष वा आॅनलाइन चौकशीत तीन पट वाढ झाली आहे. कर्जाच्या मागणीवरच आम्ही आता लक्ष केंद्रित केले आहे. रजनीश कुमार म्हणाले की, जर कर्जाची मागणी वाढत असेल तर संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी ती सकारात्मक बाब असेल. डेबिट आणि अन्य कार्डच्या वापरातही मोठी वाढ झाली आहे. व्यापारी वर्गातही ई-वॉलेट आणि अन्य कॅशलेस व्यवहारांत वाढ झाली आहे. या बँकेने नोटाबंदीनंतर ४५ हजार पीओएस मशिनचे वाटप केले आहे. गत वर्षी बँकेने एक लाख पीओएस मशिनचे उद्दिष्ट ठेवले होते. यंदा ते दुपटीने वाढविले आहे.रिझर्व्ह बँकेच्या एका ताज्या आकडेवारीनुसार, गत अनेक वर्षांत प्रथमच या डिसेंबरमध्ये गृह कर्जाची मागणी अतिशय कमी झालेली आहे. परंतु, आता एसबीआयने गृह कर्जाच्या व्याजदरात कपात केल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक गृह कर्जाबाबत विचारणा करीत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आणि जुने कर्जदारही येथे विचारणा करीत आहेत. अन्य बँकांचे गृह कर्जाचे दर हे एसबीआयच्या तुलनेत काही प्रमाणात जास्त आहेत. ज्या खासगी बँकांकडून नागरिकांनी गृह कर्ज घेतले आहे ते आता लोन ट्रान्स्फरच्या पर्यायाकडे पाहत आहेत. (वृत्तसंस्था)असे आहेत एसबीआयचे गृह कर्जाचे दरच्एसबीआयच्या वेबसाईटवर गृह कर्जाचे दर अपडेट करण्यात आले आहेत. जानेवारी २०१७पासून यात बदल करण्यात आल्याचे दिसत आहे. हे दर ८.६० ते ८.७० टक्के आहेत. च्म्हणजेच एक लाखासाठी  776 रुपये असा ईएमआय आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी ३० वर्षांपर्यंत आहे. प्रोसेसिंग फी ०.३५ टक्के आहे.