नवी दिल्ली: कोरोनावर मात केल्यानंतर श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्यानं एम्समध्ये उपचार घेत असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना डिस्चार्ज मिळाला आहे. शहांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. अमित शहांना एम्सच्या कार्डियो न्युरो टॉवरमध्ये उपचार करण्यात आले. याआधी कोरोनानंतरच्या उपचारांसाठी शहा एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना ३१ ऑगस्टला डिस्चार्ज मिळाला. यानंतर त्यांना श्वासोच्छवास घेण्यास अडचणी येऊ लागल्या. त्यामुळे त्यांना शनिवारी एम्समध्ये दाखल करण्यात आलं.उपचार घेत असलेले रुग्णालयातूनही सक्रिय होते. कालच त्यांनी गुजरातमधल्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातील २२९ कोटींच्या जलपूर्ती योजनेचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भूमिपूजन केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात 'सेवा सप्ताहा'चं आयोजन केलं गेलं आहे. याच उपक्रमाच्या अंतर्गत शहांनी योजनेचं भूमिपूजन केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना एम्समधून डिस्चार्ज; रुग्णालयातूनही सुरू होतं कामकाज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 7:24 PM