नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात त्यांनी झालेल्या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते. केंद्रीय गृहमंत्री पत्रात लिहितात की, तुमचे पती एक आदर्श पोलीस होते. ज्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागले होते. खर्या सैनिकाप्रमाणे त्यांनीही या देशाच्या सेवेसाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. तुम्हाला दु:ख आणि अकाली नुकसान सहन करण्याची देवानं शक्ती द्यावी ही प्रार्थना करतो. या दुःखाच्या क्षणी संपूर्ण देश तुमच्या कुटुंबासमवेत आहे.
दिल्लीतल्या हिंसेत शहीद पोलिसाच्या पत्नीला अमित शाहांनी लिहिलं पत्र, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 9:22 PM
अमित शाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे.
ठळक मुद्देशाह यांनी उत्तर पूर्व दिल्लीत नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सुरू असलेल्या हिंसाचारादरम्यान शहीद झालेल्या हेड कॉन्स्टेबल रतन लालच्या पत्नीला पत्र लिहिलं आहे. तुमच्या पतीचा अनैसर्गिक झालेल्या मृत्यूवर मला दुःख आहे. त्यासाठी मी सहवेदनाही व्यक्त करतो. 42 वर्षांचे हेड कॉन्स्टेबल रतन लाल सहाय्यक पोलीस आयुक्त, गोकुलपुरीच्या कार्यालयात कार्यरत होते.