शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर गृहमंत्री शहा नाराज, मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात काही उल्लेख टाळायला हवे होते

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2020 1:49 AM

महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे का रण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. (Home Minister Shah)

ठळक मुद्देराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने शहा नाराज झाले आहेत.महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे कारण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच आहेत.

नवी दिल्ली :  ‘तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता अचानक तुम्ही सेक्युलर झालात का?’ असा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका पत्रामध्ये केलेला उल्लेख टाळायला हवा होता, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या उल्लेखाने शहा नाराज झाले आहेत.

महाराष्ट्राला कोरोनाच्या संसर्गाचा मोठा फटका बसला आहे. या कोरोना साथीचे कारण सांगत महाराष्ट्रातील प्रार्थनास्थळे अद्यापही बंदच ठेवल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसांपूर्वी लिहिले होते. त्या पत्रावरून मोठा वाद झाला होता. राज्यात घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात अशा प्रकारची भाषा असावी का, यावरही खूप चर्चा झडली होती. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी आपले मत व्यक्त केले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपली भावना अधिक उत्तम शब्दांत व्यक्त करता आली असती. 

या पत्रात भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना म्हटले होते की, मुख्यमंत्री होताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजाही केली होती. तुम्ही स्वत:ला रामभक्त म्हणवता व मग आता तुम्हाला प्रार्थनास्थळे खुली करण्यासाठी दैवी संकेत मिळणार आहेत का? 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पाठविलेल्या पत्राला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्या हिंदुत्त्वाला कोणाच्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रात मुख्यमंत्र्यांबाबत जे उद्गार काढले त्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविले होते. शेरेबाजी अयोग्य -केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात कोश्यारी यांनी केलेली शेरेबाजी अयोग्य होती. त्यांनी त्या पत्रामध्ये काही शब्द वापरले नसते तर बरे झाले असते. 

टॅग्स :Amit Shahअमित शहाbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीUddhav Thackerayउद्धव ठाकरे