शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

CoronaVirus News : 1 ऑक्टोबरपासून देशभरात चित्रपटगृह सुरू होणार?, जाणून घ्या 'त्या' मागचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 9:45 AM

कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. मार्चपासून गेले सहा-सात महिने चित्रपटगृह बंद आहेत

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोरोनामुळे सर्वच व्यवसायांवर मोठे संकट कोसळले आहे. मार्चपासून गेले सहा-सात महिने चित्रपटगृह बंद आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे. ज्यामध्ये देशभरात 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजमध्ये गृह मंत्रालयाने काही कडक नियमांसह 1 ऑक्टोबरपासून चित्रपटगृह पुन्हा एकदा सुरू करण्याचे आदेश दिले असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता ही माहिती खोटी असल्याचं समोर आलं आहे. भारत सरकारचं अधिकृत ट्विटर हँडल असणाऱ्या पीआयबी फॅक्ट चेक (PIB Fact Check) ने या दाव्याबाबत तपास केला सत्य समोर आलं आहे. त्यांनी हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. 

चित्रपटगृह, स्विमिंग पूल 30 सप्टेंबरपर्यंत राहणार बंद 

पीआयबी फॅक्ट चेकने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने चित्रपटगृह पुन्हा उघडण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचं म्हटलं आहे. अनलॉक 4.0 मध्ये मेट्रो सेवा सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र चित्रपटगृह, स्विमिंग पूल आणि थिएटर 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनानंतर देखील प्रेक्षक चित्रपटगृहाकडे लगेचच वळण्याची शक्यता कमी आहे. ओटीटी वगैरे सारखी नवीन करमणुकीची  माध्यम उपलब्ध झाली आहेत. 

एकपडदा चित्रपटगृहे बंद करुन इतर व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्या; मुख्यमंत्र्यांना निवेदन

एकपडदा चित्रपटगृहे पुन्हा सुरू झाल्यानंतरही तग धरुन राहणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने एकपडदा चित्रपटगृहे बंद करुन त्या जागेत दुसरा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे एक्झिबिटर्स असोसिएशनतर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबतचे लेखी पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. चित्रपटगृहे चार महिन्यांपासून बंद आहेत. तरीही कर्मचाऱ्यांचे पगार, साफ सफाई यावर महिना 30 ते 50 हजार रुपये खर्च करावा लागत आहे. यासाठी व्यावसायिकांनी बँकेचे कर्ज काढले आहे. उत्पन्न कमी आणि खर्च जास्त या परिस्थितीला तोंड देत सुरू ठेवलेला व्यवसाय यापुढे करायचा की नाही, या विचारापर्यंत चित्रपटगृहांचे मालक आले आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या

Apple Event 2020 : बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच न झाल्याने 'नाराजी'चा सूर, ट्विटरवर आला भन्नाट रिअ‍ॅक्शनचा पूर

Apple Event 2020 : अवघ्या 15 सेकंदांत रक्तातील ऑक्सिजन मोजणार, दमदार फीचर्ससह Apple Watch 6 लाँच

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

डेटिंग वेबसाईट्सद्वारे मोठा 'गेम', हॅकर्सनी चोरला लाखो युजर्सचा डेटा

CoronaVirus News : बापरे! कोरोना लसींच्या चाचण्यांची माहिती लपवताहेत कंपन्या, शास्त्रज्ञांनी केलं अलर्ट

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcinemaसिनेमाTheatreनाटकIndiaभारत