नवी दिल्ली: गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागलं. कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरलेले आंदोलक थेट लाल किल्ल्यात शिरले. यावेळी अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. यामध्ये ३०० पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयानं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांबद्दलचं विधान भोवलं; ६ दिग्गज ब्रँण्ड्सकडून कंगना रणौतसोबतचे करार रद्दप्रजासत्ताक दिनी हिंसाचार घडवून आणणाऱ्या, त्यात सहभाग असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृह मंत्रालयाकडून दिल्ली पोलिसांसह शेजारील राज्यांच्या पोलिसांना देण्यात आले आहेत. काल झालेल्या हिंसाचाराची चौकशी दिल्ली पोलिसांची गुन्हे शाखा करेल. यासाठी आज संध्याकाळपर्यंत एक विशेष तपास पथक स्थापन करण्यात येईल. हिंसाचाराआधी झालेल्या घडामोडी, त्यानंतर झालेला हिंसाचार या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी पथकाकडून केली जाईल.खळबळजनक! "काठ्या घेऊन रॅलीत या"; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा व्हिडिओ व्हायरलकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्ली-एनसीआरमध्ये शेतकरी आंदोलन करत आहेत. गृह मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी संघटनांना आज संध्याकाळपर्यंत आंदोलन सुरू असलेल्या जागा सोडाव्या लागू शकतात. तसे आदेश गृह मंत्रालय देऊ शकतं. शेतकरी संघटनांनी आंदोलनस्थळं मोकळी करण्यास नकार दिल्यास कठोर कारवाई केली जाऊ शकते, असं वृत्त 'न्यूज १८ इंडिया'नं दिलं आहे.लाल किल्ल्यावरचा 'व्हिलन' दीप सिद्धूला शेतकऱ्यांनी पळवून लावले; Video व्हायरलप्रजासत्ताक दिनी हिंसाचार भडकलेल्या भागांत पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी गृह मंत्रालयाला दिलेल्या माहितीनंतर हे पाऊल उचलण्यात आलं. काल हिंसाचार उफाळलेल्या भागातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. आज संध्याकाळपर्यंत निमलष्करी दलाचे जवान दिल्लीत दाखल होतील. दिल्ली शेजारच्या हरयाणा आणि उत्तर प्रदेशातल्या सर्व भागांत अलर्ट जारी करण्यात आला आहे. फरिदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये विशेष सुरक्षा दलांना तैनात करण्यात आलं आहे.
अमित शहा इन ऍक्शन! गृह मंत्रालय मोठी कारवाई करण्याच्या तयारीत; पुढील काही तास महत्त्वाचे
By कुणाल गवाणकर | Published: January 27, 2021 1:17 PM