शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
पुतिन यांना सिक्रेट गर्लफ्रेंडपासून दोन मुलं ! गर्लफ्रेंड एलिना कबेवा आंतरराष्ट्रीय दर्जाची रिदमिक जिम्नॅस्ट
5
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
6
श्रीमंतांचा मोठा दबदबा, ५ वर्षांत विक्रमी कमाई; वर्षाला १० कोटी कमावणाऱ्यांची संख्या ३१,८०० वर
7
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
8
कामात समाधान नसल्यास दोन वर्षांत सोडणार नोकरी; ४७% तरुण नोकरी सोडण्याच्या तयारीत
9
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
10
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
11
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
12
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
13
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
14
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
15
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
16
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
17
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
18
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
19
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
20
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!

‘मदरसे बनताहेत समलैंगिकांचे अड्डे’

By admin | Published: May 27, 2015 11:57 PM

देशातील मदरशांमध्ये समलैंगिकतेचा बोलबाला आहे. मौलांनाचाही त्यात सहभाग असून, या मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम तरुणांचे भविष्य सुधारेल,

नवी दिल्ली : देशातील मदरशांमध्ये समलैंगिकतेचा बोलबाला आहे. मौलांनाचाही त्यात सहभाग असून, या मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम तरुणांचे भविष्य सुधारेल, असा गौप्यस्फोट अलिगड मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकाने केल्यानंतर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांत संतापाची लाट पसरली आहे.दरम्यान, वसीम राजा नामक या प्राध्यापकाने त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचा इन्कार केला आहे. आपण असे काहीही बोललो नाही. आपला फोन हॅक करण्यात आला, असा त्यांचा दावा आहे. वसीम राजा मागील ३० वर्षांपासून विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आहेत. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राजा यांनी व्हॉटस् अ‍ॅपवर एका वृत्तवाहिनीला पाठविलेल्या संदेशात देशातील मदरसे अधर्म आणि समलैंगिकांचे अड्डे बनत चालले असून मौलांनाही यात सामील आहेत. या सर्व मदरशांवर बंदी घातली तरच मुस्लिम युवकांचे भविष्य बदलेल, असे लिहिल्याचा आरोप आहे. (वृत्तसंस्था)