लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरू : जेव्हा ‘डेटिंग’चा प्रश्न येतो तेव्हा सध्याची तरुणाई अर्थात ‘जेन झेड’ त्यांच्या हेतूबद्दल स्पष्ट असतात आणि ‘सिच्युएशनशिप’ (तेवढ्यापुरती, नात्याला नाव नाही, कुठलीही कमिटमेंट नाही) नाते हवे असल्याचे सांगण्यास लाजत नाहीत, असे डेटिंग ॲप ‘टिंडर’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
‘सिच्युएशनशिप’ हा ‘जेन झेड’चा शब्द आहे. त्यात आधी किंवा नंतरचा कोणताही विचार न करता नाते जोडले जाते. नातेसंबंधासाठी सध्याच्या ‘द फ्युचर ऑफ डेटिंग’ या अभ्यासानुसार, बेंगळुरूच्या टिंडर वापरकर्त्यांपैकी ४३ टक्के डेटिंगसाठी प्राधान्याने ‘सिच्युएशनशिप’ची निवड करतात. (वृत्तसंस्था)
52 टक्के सिंगल्स आहेत डेटिंग ॲप्सवरबेंगळुरूमध्ये सर्वेक्षण केलेल्या ‘सिंगल्स’पैकी अर्ध्याहून अधिक (५२ टक्के) डेटिंग ॲप्स वापरतात. येथील तरुणाईसाठी डेटिंगचा निर्णय घेताना संगीतामधील एकसमान आवड हा एक प्रमुख घटक आहे. ३२ टक्क्यांहून अधिकांनी संगीताची आवड जोडीदाराचे व्यक्तिमत्व ओळखण्यात मदत करते, असे म्हटले आहे. पहिल्या डेटसाठी म्युझिक कॉन्सर्टसारखे कार्यक्रम अनेक बंगळुरूकरांची पहिली पसंती आहे.
कुणाशीही, कधीही नाते... पण सुरक्षित हवे ५४ टक्के तरुणाई भिन्नलिंगी व्यक्तीशी डेटिंगसाठीही तयार आहे आणि ३९ टक्के अन्य जाती-धर्म व संस्कृतीच्या लोकांशीही डेटिंगसाठी खुली आहे. ही पिढी वैयक्तिक सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देते. पुढचे पाऊल उचलण्यापूर्वी ४९ टक्के तरुणाई डेटिंग साइटवर सत्यापित प्रोफाइल आहे का ते तपासते आणि ४६ टक्के धोका टाळण्यासाठी इतर सोशल मीडिया प्रोफाइलदेखील तपासतात.
डेटिंग आत्मशोधाचा मार्ग nटिंडर इंडियाच्या कम्युनिकेशन्सच्या संचालक आहाना धर म्हणाल्या की, सर्वेक्षणाचा भाग म्हणून बेंगळुरूसह अनेक भारतीय शहरांमध्ये १८ ते ३० वयोगटातील १,०१८ भारतीय तरुणांना प्रश्न विचारण्यात आले. nजेन झेडने पूर्वीचे डेटिंग मापदंड पूर्णपणे नाकारले आहेत. स्वत:ची काळजी घेण्यावर भर दिला जात आहे. मानसिकदृष्ट्या काळजी न घेणारा जोडीदार त्यांना नको आहे.nदिसण्यापेक्षा तरुणाईसाठी जोदीडाराचा हेतू, प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. तरुणाई आत्मशोधाचा मार्ग म्हणूनही डेटिंगकडे पाहते.