शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
3
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
4
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
5
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
6
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
7
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
8
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
9
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
10
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
11
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
12
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
13
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
14
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
15
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
16
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
17
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
18
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
19
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
20
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार

हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 5:52 PM

या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे.

ठळक मुद्देआरएसएसवाल्यांवर ताशेरे ओढत आरएसएसवाले लग्न नाही करत; किमान आता तरी संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी लग्न करावे असा खोचक सल्ला दिला आहे. लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली - मध्य प्रदेशात सध्या गाजत असलेल्या हनी ट्रॅपप्रकरणाची व्याप्ती असून या प्रकरणात आतापर्यंत अनेक बडे अधिकारी आणि राजकारण्यांची चौकशी झाली आहे. मध्य प्रदेशातील हनी ट्रॅप रॅकेटमधील खुलाशाने अनेक नेते, अधिकारी आणि व्यापाऱ्यांची झोप उडाली आहे. देशातील सर्वात मोठे ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल असणाऱ्या या प्रकरणाशी संबंधीत ४००० फाईल्स तपास यंत्रणांना मिळाल्या आहेत. आता तर या प्रकरणाने एक नवीन वळण घेतले आहे. या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. त्यांनी आरएसएसवाल्यांवर ताशेरे ओढत आरएसएसवाले लग्न नाही करत; किमान आता तरी संघाचे सरसंचालक मोहन भागवत यांनी लग्न करावे असा खोचक सल्ला दिला आहे. काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी आज 'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्या काळात हा सर्व प्रकार सुरु झाला. यामध्ये भाजपचे विशेषत: आरएसएसचे अनेक नेते गुंतले आहेत. यासाठी त्यांचे ब्रह्मचर्य कारणीभूत आहे. त्यामुळेच हे सर्व नेते हनीट्रॅपमध्ये अडकले. किमान आता तरी संघाच्या नेत्यांनी लग्न करायला पाहिजेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनीही लग्न करावे असे म्हटले आहे. .पोलिसांच्या विशेष पथकाकडून (एसआयटी) या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामध्ये हा सर्व प्रकार शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री असताना सुरु झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे सेक्स स्कँडल केवळ मध्य प्रदेशपुरता मर्यादित नसून तब्बल पाच ते सहा राज्यांमध्ये त्याची व्याप्ती असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले. या हनी ट्रॅपप्रकरणी पाच आरोपींसोबत अटक करण्यात आलेल्या १८ वर्षीय आरोपी मोनिका यादव हिने सरकारी साक्षीदार बनण्यास तयारी दर्शविली आहे. या प्रकरणात मोनिका यादव मुख्य साक्षीदार असणार आहे. त्यामुळे लवकरच या मोठ्या ब्लॅकमेलिंग सेक्स स्कँडल प्रकरणी नवीन खुलासे येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशhoneytrapहनीट्रॅपRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ