भारतीय नौदलाशी संबंधित गुप्त माहिती मिळविण्यासाठी पाकिस्तान हनी ट्रॅपचा वापर करत आहे. नुकतेच, महाराष्ट्र एटीएसने माझगाव डॉक येथे कार्यरत असलेल्या कल्पेश बायकर नावाच्या 30 वर्षीय तरुणाला पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह (पीआयओ) एजंट्स सोबत संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
आरोपी कल्पेशच्या अकाउंटमध्ये PIO च्या एजन्ट्सने 2000 रुपये पाठवले होते आणि हे पैसे पाठवण्यासाठी नवी दिल्लीतील किरन पाल सिंह नावाच्या व्यक्तीच्या बँक अकाउंटचा वापर करण्यात आला होता. सिंह SBI मध्ये काम करत होते. ते निवृत्त आहेत. सिंह यांनी ATS ला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी ते 2000 रुपये वेल नोन “बिटकॉइन एक्सचेन्ज आणि अल्टकॉइन क्रिप्टो एक्सचेन्ज अॅप्लिकेशन”वर डॉलर खरेदी करण्यासाठी दिले होते आणि हे पैसे कल्पेशच्या अकाउंटमध्ये कसे गेले याची माहिती त्यांना नाही, असे चौकशीतून समोर आले आहे.
25 सबमरीन आणि वॉरशिपचे स्केच केले शेअर -या तपासात, एजन्सींना मोठी माहिती मिळाली आहे. पाकिस्तानी ISI एजंट्सकडून आपली ओळख लपविण्यासाठी “बिटकॉइन एक्सचेन्ज आणि अल्टकॉइन क्रिप्टो एक्सचेन्ज अॅप्लिकेशन”चा कशा पद्धतीने वापर केला जात आहे आणि भारताची संवेदनशील माहिती मिळवत आहेत, हे एजन्सींच्या लक्षात आले आहे. महत्वाचे म्हणजे, कल्पेशने PIO च्या महिला एजन्ट सोनाली शर्माला अटकेपूर्वीपर्यंत 25 सबमरीन आणि वॉरशिपचे स्केच्स शेअर केले होते.
चौकशीत कल्पेशने काय सांगिलं? - चौकशी दरम्यान कल्पेश म्हणाला, त्याचा 29 वा वाढदिवस होता, तेव्हा त्याने सोनाली शर्मा (PIO ची महिला एजन्ट)कडे वाढदिवसाचे गिफ्ट मागत, तीने त्या दिवशी प्रत्यक्ष भेटावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, त्या दिवशी सोनालीने त्याला काही बहाणा करत भेटण्यास नकार दिला आणि पुन्हा भेटू असे सांगितले. तसेच, तिने कल्पेशच्या बँक अकाउंटमध्ये सिंह यांच्या अकाउंटवरून 2000 रुपयेही पाठवले आणि या पैशांतून शॉपिंग करायला सांगितले.