शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

पोलिसांच्या आधी मीडियाला सापडलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 3:07 PM

मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. पंजाब पोलिसांनी हनीप्रीतला हरयाणा पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

ठळक मुद्देवडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. मीडियावर आरोप लावताना हनीप्रीत म्हणाली, ज्या हनीप्रीतला तुम्ही दाखवलं ती हनीप्रीत तशी नाहीये.

पंचकुला -  मागच्या महिन्याभरापासून फरार असलेल्या हनीप्रीत इन्साने अखेर मंगळवारी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. ती हरयाणा पोलिसांच्या ताब्यात आहे. हनीप्रीत बाबा गुरमीत राम रहीमची दत्तक मुलगी आहे. राम रहीम साध्वींवरील बलात्कार प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. हनीप्रीतने आत्मसमर्पण करण्याआधी माध्यमांना मुलाखती दिल्या. त्यात तिने आपली बाजू मांडली. राम रहीम आणि ती पूर्णपणे निर्दोष असल्याचा दावा तिने केला. वडिलांबरोबर आपल नातं पवित्र असल्याचं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं. हनीप्रीतचा पूर्वपती विश्वास गुप्ताने हनीप्रीतचे राम रहीमबरोबर अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. मी राम रहीम आणि हनीप्रीतला एकत्र नेकेड,  सेक्स करताना बघितले होते असे विश्वास गुप्ताने पत्रकार परीषदेत सांगितले होते. 

25 ऑगस्टला पंचकुला न्यायालयाने राम रहीमला साध्वींवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले. त्यानंतर हरयाणा, पंजाब आणि दिल्लीमध्ये जोरदार हिंसाचार झाला. या सर्व घडामोडींनंतर हनीप्रीत गायब झाली. तिच्यासह डे-यातील काही सदस्यांवर हिंसाचारासाठी चिथावणी दिल्याचा आरोप आहे. मागच्या आठवडयात दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला. हनीप्रीत नेपाळला पळून गेल्याचीही चर्चा होती. 

मीडियावर आरोप लावताना हनीप्रीत म्हणाली, ज्या हनीप्रीतला तुम्ही दाखवलं ती हनीप्रीत तशी नाहीये. हनीप्रीतचं ज्या प्रकारचं चित्रं उभं केलंय त्यामुळे मी स्वतःही हनीप्रीतला घाबरायला लागली आहे. मी माझी मानसिक स्थिती सांगू शकत नाही. मला देशद्रोही म्हटलं गेलं हे साफ चुकीचं आहे. जी मुलगी तिच्या वडिलांसोबत देशभक्तीबाबत बोलायची तेच तुरूंगात गेल्यावर मी असहाय झाली होती. नंतर माझ्यावरच देशद्रोहाचे आरोप लावण्यात आले. वडील तुरूंगात गेल्यावर मला माझ्या जवळ असलेल्या व्यक्तींनी जो सल्ला दिला मी त्याप्रमाणेच वागली, मला काही समजत नव्हतं.

मुलाखती दरम्यान रडता-रडता हनीप्रीत म्हणाली, तुम्ही माझी मानसिक स्थिती समजून घ्या, मी डिप्रेशनमध्ये गेली होती.  मला कधीच हिरोइन बनायचं नव्हतं असं तिने सांगितलं. इतके दिवस गायब असण्याच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, मला काही समजत नव्हतं. मी हरियाणातून कशीतरी दिल्लीला गेले. आता हरियाणा-पंजाब कोर्टात जाणार आहे. पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पणाच्या प्रश्नावर हनीप्रीत म्हणाली की, यासाठी ती कायदेशीर सल्ला घेणार आहे.

'सिरसामध्ये जे काही घडलं त्यामुळे मी खूप घाबरले होते. माझी तेव्हाची मानसिक अवस्था आता सांगता येणार नाही. मला कुठल्याही प्रकारची कायदेशीर प्रक्रिया माहिती नव्हती. मी माझ्या वडिलांबरोबर हेलिकॉप्टरमध्ये कशी गेली? असा सवाल मला लोक विचारतात पण ही गोष्ट कोर्टाच्या परवानगी झाली, असं हनीप्रीतने या मुलाखतीत सांगितलं.

टॅग्स :Baba Ram Rahimबाबा राम रहीम