नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मान्यवरांनी त्यांच्या ५५ व्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली अर्पण केली. यात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, यूपीएच्या प्रमुख सोनिया गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश होता. याशिवाय राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पक्षाच्या अन्य वरिष्ठ नेत्यांनी शांतीवन येथे नेहरूंना आदरांजली अर्पण केली.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी टिष्ट्वट केले आहे की, अनेक देशांनी भारतासोबतच स्वातंत्र्य मिळविले. पण, लवकरच त्याचे रूपांतर हुकूमशाहीमध्ये झाले. नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही मजबूत, स्वतंत्र, आधुनिक संस्था उभारणीतील त्यांच्या योगदानाला उजाळा देत आहोत.देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचे २७ मे १९६४ रोजी निधन झाले होते. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये झाला होता. ते जवळपास १७ वर्षे भारताचे पंतप्रधान होते.>मोदींकडून आदरांजलीदेशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण करून त्यांच्या योगदानाला उजाळा दिला.मोदी यांनी टष्ट्वीट केले की, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली. राष्ट्र निर्माणासाठीचे त्यांचे योगदान संस्मरणीय आहे.उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी टष्ट्वीट केले की, आधुनिक भारताच्या उभारणीत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.
पंडित नेहरू यांना मान्यवरांची आदरांजली, सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 4:12 AM