शासन मागविणार हुडकोची भूमिका ३३ कोटी मनपाने अतिरिक्त भरले : उपसचिवांकडे कागदपत्रे सादर
By admin | Published: November 05, 2016 12:14 AM
जळगाव : महापालिकेने विविध विकास कामांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा ३३ कोटी अतिरिक्त भरणा झाला असल्या संदर्भातील कागदपत्रे व आकडेमोडीचा तपशिल आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव संजय गोखले यांना सादर केली. याप्रश्नी आठवडाभरात हुडकोकडून उत्तर मागविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जळगाव : महापालिकेने विविध विकास कामांसाठी हुडकोकडून घेतलेल्या कर्जाचा ३३ कोटी अतिरिक्त भरणा झाला असल्या संदर्भातील कागदपत्रे व आकडेमोडीचा तपशिल आयुक्त जीवन सोनवणे यांनी नगरविकास खात्याचे उपसचिव संजय गोखले यांना सादर केली. याप्रश्नी आठवडाभरात हुडकोकडून उत्तर मागविले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने हुडकोकडून १४१ कोटी ३८ लाखांचे कर्ज १९८९ ते २००१ या काळात घेतले होते. महापालिकेच्या माहितीनुसार या कर्जापोटी व्याजाच्या रकमेसह आतापर्यंत २७३ कोटी २१ लाखांची परतफेड करण्यात आली आहे. काही काळ कर्ज थकल्यानंतर व्याजासह त्याची रकम वाढली. याप्रश्नी हुडकोने डीआयटी कोर्टात धाव घेतली होती. डीआयटी कोर्टाने महापालिकेस याप्रश्नी ३४१ कोटींच्या जप्ती कारवाईची (डीक्री) नोटीस बजावली होती. त्यानंतर डीआरटीच्या आदेशानुसार महापालिका या कर्जापोटी दरमहा एक कोटींचा भरणा हुडकोकडे करत आहे. तर महापालिकेस शासनाकडून मिळणार्या विविध अनुदानाच्या रकमाही परस्पर कर्ज हप्त्यांपोटी वळत्या करून घेण्यात आल्या आहेत. शासनास माहिती सादरयाप्रश्नी मनपाने नेमलेल्या सनदी लेखापाल अनिल शहा यांनी (सीए) परिश्रमपूर्व २००४ नंतर मनपाने हुडकोला भरणा केलेल्या रकमेचा तपशील दरमहानिहाय गोळा करून हुडकोच्या कर्जापोटी दिलेेल्या हप्त्यांचा सविस्तर तपशिल एकत्र करून देय असलेल्या रक्कमेपेक्षा ३३ कोटींचा अधिक भरणा हुडकोकडे केला असल्याचे आढळून आले आहे. या आकडेवारीनुसार मागील वर्षी ४ ऑक्टोबर २०१५ रोजीच हे कर्ज फिटले असून त्यानंतर ११ महिने मनपाने अतिरिक्त हप्ता भरला असल्याचा मनपाचा दावा असून आयुक्त जीवन सोनवणे व सीए अनिल शहा यांनी याबाबत नगर विकास विभागाचे उपसचिव संजय गोखले यांच्याकडे या संदर्भातील कागदपत्रे सादर करून या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हुडकोला ही माहिती देऊन त्यांच्याकडून कर्ज फेडीचा तपशिल मागवावा अशी मागणीही या चर्चे दरम्यान करण्यात आली. हुडकोकडून माहिती मागविणारमनपाच्या या कर्जाला शासनाची हमी आहे त्यामुळे आता नरगविकास विभाग याप्रश्नी हस्तक्षेप करून हुडकोकडे मनपाने दिलेली कागदपत्रे सादर करून येत्या आठवडाभरात त्यांचे म्हणणे व त्यांच्याकडे उपलब्ध असलेली कर्जफेडीची माहिती मागवून घेणार आहे. ------