नवी दिल्ली : देशाच्या रक्षणासाठी गेली अनेक वर्षे सज्ज असलेली व 1971 च्या युद्धातील विजयात मोलाची कामगिरी बजावून नौदलाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या ‘विक्रांत’ या विमानवाहू युद्धनौकेचे संग्रहालयाच्या स्वरूपात जतन करण्याच्या अभियानाला मान्यता देत सरकारने हा प्रस्ताव संस्कृती मंत्रलयाकडे पाठविला आहे.
16 हजार टन वजनाच्या या युद्धनौकेला कवडीमोल भावाने भंगारात विकण्याऐवजी तिचे रूपांतर संग्रहालयात करावे अशी मागणी असून, या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेला ही माहिती देताना याबाबतीत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अंतिम राहील, असे स्पष्ट केले आहे. लोकसभा सदस्य किरीट सोमय्या यांच्यासह पुरुंदेश्वरीदेवी व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व नौवहन मंत्री नितीन गडकरी तसेच भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी विक्रांतला वाचविण्यासाठी विनंती पत्र संरक्षण मंत्रलयाला पाठविले होते.
महाराष्ट्र सरकारने या युद्धनौकेचे रूपांतर समुद्री संग्रहालयात करण्यात आपली असमर्थता व्यक्त केल्याने, 2क्13 मध्ये या नौकेचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार या नौकेची बोली 64 कोटी एवढी आकारण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ‘विक्रांत’ भंगारात काढणयास हिरवा कंदील दाखविल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाऊन तेथे ‘जैसे थे’स्थिती ठेवण्याचा आदेश् झाला आहे.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4पाकिस्तानविरुद्धच्या लढाईत आयएनएस विक्रांतने बंगालच्या खाडीत शत्रूचे सर्व मार्ग रोखून धरले होते. साठच्या दशकात भारताच्या नाविक दलात सामील झालेल्या या युद्धनौकेला 1997 मध्ये निवृत्त करण्यात आले होते.